पुणेः महिला आता कुठल्याही क्षेत्रात मागास राहिलेल्या नाहीत. मुली उच्च शिक्षण घेत आहेत, प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमठवत आहेत. मात्र, तरीही कामाच्या ठिकाणी आजही महिलांना दुजाभावाचा सामना करावा लागतो. तरीही, योग्यवेळी संधी, कुटूंबाचा भक्कम पाठिंबा मिळाल्यास महिला कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतात, इतकी ताकद त्यांच्यात असते, असे मत औद्योगिक शिक्षण मंडळ शिक्षण समूहाच्या (एएसएम) ट्रस्टी डाॅ. प्रिती पाचपांडे dr priti paachapaande यांनी व्यक्त केले.

त्या एमआयटी आर्ट mit , डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्याचा आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम व त्यानिमित्त आयोजित कर्तृत्ववान महिला पुरस्कारांचे वितरण समारंभात बोलत होत्या. याप्रसंगी, रिलायन्स लाइफ सायन्सच्या व्यावसायिक प्रमुख डाॅ.शैलजा सक्सेना, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरु प्रा.डाॅ.मोहित दुबे, एमआयटी स्कुल ऑफ बायो इंजिनिअरिंगच्या प्राचार्या डाॅ.रेणू व्यास, डाॅ.अश्विनी पेठे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डाॅ.सक्सेना म्हणाल्या, अनेक विद्वानांनी म्हटल्याप्रमाणे एक महिला शिकली तर ती दोन कुटूंबांचा उद्धार करते. त्यामुळे मुलींना शिकविण्यात पालकांनी कुचराई टाळायला हवी. तसेच, मी माझे बाळ अवघे वर्षभराचे असताना संशोधन (पी.एच.डी.) कार्य सुरु केले. बाळाचा सांभाळ करतानाच संशोधन तर पूर्ण केलेच परंतू, कोरोना काळात स्वतः चाचणी लॅब टाकू शकले याचा आनंद आहे. त्यामुळे, आई झाल्यानंतरही महिला कुटूंबाचा पाठिंबा असेल सामाजात बदल घडवू शकते, असेही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाचा प्रारंभ विश्वशांती प्रार्थनेने झाला. त्यानंतर विद्यापीठाच्य विद्यार्थ्यांनी महिलांवरील नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात करण्यात आला.

चौकट
कर्तृत्ववान महिलांचा गौरव
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत प्रभावीपणे काम करणाऱ्या महिलांचा एमआयटी एडीटीतर्फे पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये सौ.गौरी देशपांडे, प्रतिमा जोशी, डाॅ.अनिंदिता बॅनर्जी, डाॅ.सारिका भोसले-फुंदे, सौ.वृषाली खंडागळे, डाॅ.पारुल गंजू, सौ.सुनिता शेंडे, सौ.वंदना येरमरकर, प्रा.निशिगंधा पटेल, डाॅ.रिना पगारे यांचा समावेश होता.