16.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्रमहिला सक्षमीकरणासाठी जुही मेळावा उत्तम व्यासपीठ - खासदार श्रीरंग बारणे 

महिला सक्षमीकरणासाठी जुही मेळावा उत्तम व्यासपीठ – खासदार श्रीरंग बारणे 

चिंचवड येथे एकविसाव्या शतकातील महिलांचे संघटन असलेला जुही मेळावा संपन्न

पिंपरी, – महिलांना संधी दिल्यास त्या राष्ट्रपतीपदाची देखील जबाबदारी सांभाळू शकतात. सुनीता विल्यम सारख्या अंतराळवीर आपल्या जिद्द व चिकाटीने जागतिक रेकॉर्ड देखील करू शकतात. अशा महिलांना योग्य संधी व व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. विश्वभारतीय संस्थेने जुही मेळाव्याच्या माध्यमातून महिला साहित्यिकांना संधी उपलब्ध करून दिली आहे. असे उपक्रम गौरवास्पद आहेत. महिलांनी अशा कार्यक्रमात पुढे येऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. 

   विश्वभारती संस्था अहमदाबाद, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, साहित्य प्रेमी भगिनी मंडळ आणि पुणे गुजराती केळवणी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे रविवारी (दि.२३ मार्च) भारतीय लेखिकांचा सहभाग असणारे संमेलन “जुही मेळावा २०२५”  चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार बारणे बोलत होते.

  यावेळी आमदार उमा खापरे, विश्वभारती संस्था अहमदाबाद प्रमुख उषा उपाध्याय, उद्योगपती सुनील मेहता, पुना गुजराती केळवण मंडळ अध्यक्ष राजेश शहा, साहित्य प्रेमी भगिनी मंडळ माजी अध्यक्ष डॉ. मंदा खांडगे, महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यवाहक सुनिताराजे पवार, साहित्य प्रेमी भगिनी मंडळ अध्यक्ष अंजली कुलकर्णी व डॉ. धनंजय केळकर, मीता पीर, यामिनी व्यास, गोपाली बुच, प्रीती पुजारा, भार्गवी पंड्या,  लक्ष्मी डोबरिया, वर्षा प्रजापती, कौशल उपाध्याय, मार्गी दोशी, नियती अंतानी, डॉ. फाल्गुनी शशांक आदी उपस्थित होते. 

  आमदार उमा खापरे यांनी जुही मेळाव्याच्या आयोजकांना उत्कृष्ट आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. 

   साहित्यिक हा समाजातील संवेदना व्यक्त करणारा मुख्य घटक आहे. कथा, कादंबरी, काव्य अशा स्वरूपात आपल्या भावना व्यक्त करून समाजातील संवेदना मांडण्याचे काम लेखक करीत असतात. यातून सामाजिक संवाद वाढतो, संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत जनाबाई, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत कबीर यासारख्या संतांनी साहित्यिक म्हणून आपले पूर्ण जीवन मानव जातीच्या कल्याणासाठी वाहून घेतल्याचे दिसते. एकविसाव्या शतकातील अनेक महिलांचे संघटन करून विश्वभारती संस्थेने जुही मेळावाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण होण्यास मदत होईल आणि साहित्यिकांना पाठबळ मिळेल असे विश्वभारती संस्थेच्या प्रमुख उषा उपाध्याय यांनी प्रास्ताविकात सांगितले. 

  साहित्यप्रेमी भगिनी मंडळ अंजली कुलकर्णी यांनी सांगितले की, वेगवेगळ्या शहरांमध्ये हा मेळावा घेतला जातो. यामध्ये आमचा समावेश असणे आमचे भाग्य आहे. भारतीय समाज सुधारकांनी स्त्रियांचे जीवन सुधारण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे.

  यावेळी डॉ. नियति अंताणी, रीनल पटेल, तरु कज़ारिया, अश्विनी बापट, निरंजना जोशी, राजुल भानुशाली,माना व्यास आणि नीला पाध्ये यांचा पारितोषिक देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

  मराठी साहित्य परिषदेच्या सुनीताराजे पवार म्हणाल्या की, मेळाव्यात वेगवेगळ्या भाषा एकत्रित येतात त्या भाषा भगिनींचा मेळा म्हणजेच जुही मेळावा. साहित्य परिषदेत देखील सर्व भाषांच्या लेखकांचा आढावा घेतला जातो. 

ऑल इंडिया रेडिओ मुंबईच्या वैशाली त्रिवेदी, आचार्य चंदनाताईंचे शिष्य संघमित्रा यांनी मार्गदर्शन केले. प्रीती पुजारा यांनी कविता, पूजा पवार यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले. डॉ. फाल्गुनी शशांक यांनी अप्रतिम गाणी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी जहा, आभार नियती अंतानी यांनी मानले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
16.1 ° C
16.1 °
16.1 °
72 %
0kmh
0 %
Thu
21 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!