पिंपरी,-राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नावाने पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने दिलेला पुरस्कार मला भविष्यात नेहमी प्रेरणा देईल. समाजाने माझ्या कलेला दिलेली ही पोच पावती आहे. यातून आणखी उत्कृष्ट कला सादर करण्यासाठी ऊर्जा मिळेल असे अभिनेत्री पूजा पवार साळुंखे यांनी सांगितले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पिंपरी येथे करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार अभिनेत्री पूजा पवार – साळुंखे, क्रांतीज्योति सावित्रीबाई पुरस्कार अभिनेत्री श्रृती उबाळे, उद्योगरत्न पुरस्कार कायनेटिक ग्रीन लि. च्या संचालक सुलज्जा फिरोदिया – मोटवानी, शिक्षण महर्षी पुरस्कार आशाताई पाचपांडे, राजकीय – सरिता साने, रुपाली आल्हाट, वैज्ञानिक पुरस्कार निकिता कांबळे आणि प्रशासकीय पुरस्कार प्राजक्ता गोरडे यांना प्रदान करण्यात आला. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बचत गटातील महिलांचाही सन्मान करण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी डॉ. उषाताई कुऱ्हाडे महिलांनी विविध आजारांवर मात करुन आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर मार्गदर्शन केले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष सुनील लोणकर, पिंपरी चिंचवड शहर डिजिटल अध्यक्ष विनय सोनवणे, सागर सूर्यवंशी, चिराग फुलसुंदर, महावीर जाधव, संतोष गोतवळे, पराग डिंगणकर, मारुती बाणेर, संभाजी बारबोले, प्रसाद वडघुले, अशोक कोकणे, रमेश साठे, सिद्धांत चौधरी, प्रकाश जमाले, श्रध्दा प्रभुणे, देविदास लिमजे, आण्णा लष्करे, नरेश जिनवाल आदींसह बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक अनिल वडघुले, सूत्रसंचालन प्रा. अपर्णा शिंदे आणि आभार विनय सोनवणे यांनी मानले.
माझा गौरव भविष्यकाळात नवी ऊर्जा देईल – अभिनेत्री पूजा पवार
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
28.7
°
C
28.7
°
28.7
°
78 %
4.6kmh
97 %
Mon
29
°
Tue
34
°
Wed
36
°
Thu
35
°
Fri
30
°