13.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्रमेनिंजायटीस लसीकरणाद्वारे तरुणांचे जीवन वाचवणे- डॉ. अमिता कौल

मेनिंजायटीस लसीकरणाद्वारे तरुणांचे जीवन वाचवणे- डॉ. अमिता कौल

पुणे , – : ब्रेन फीव्हर म्हणून ओळखला जाणारा मेनिंजायटिस हा लसीकरणाद्वारे टाळता येणारा गंभीर संसर्ग आहे, जो विशेषतः लहान मुलांसाठी मोठी आरोग्याची चिंता आहे. वर्ल्ड मेनिंजायटिस डे दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश या आजाराबाबत जनजागृती करणे, लवकर निदानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि लसीकरणाद्वारे या आजाराची प्रतिबंधात्मक शक्यता वाढवणे हा आहे.

दरवर्षी जगभरात २.५ दशलक्षांपेक्षा अधिक मेनिंजायटिसची प्रकरणे नोंदवली जातात. या आजारामुळे मृत होणाऱ्यांपैकी जवळपास ७० टक्के मुले पाच वर्षांखालील असतात, यामुळे हा गंभीर जागतिक आरोग्यसंकट बनले आहे.

मेनिंजायटिस म्हणजे मेंदू व मज्जारज्जूला वेढणाऱ्या आवरणांमध्ये (मेनिंजीस) सूज येणे. हा प्रामुख्याने बॅक्टेरियल, फंगल किंवा व्हायरल संसर्गामुळे होतो. मेनिंजायटिसची लक्षणे त्याच्या कारणांवर, आजाराच्या स्वरूपावर (तीव्र, उप-तीव्र किंवा दीर्घकालीन), मेंदूच्या सहभागावर (मेनिंगो-एन्सेफेलाइटिस) आणि सिस्टमिक गुंतागुंतींवर (उदा. सेप्सिस) अवलंबून बदलतात. सामान्य लक्षणांमध्ये मान आखडणे, ताप, संभ्रम किंवा वर्तनात बदल, डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या यांचा समावेश होतो. कमी प्रमाणात आढळणारी लक्षणे म्हणजे फिट्स येणे, कोमा आणि न्यूरोलॉजिकल अडचणी (उदा. ऐकण्याची/पाहण्याची क्षमता कमी होणे, संज्ञानात्मक समस्या किंवा हात-पायांमध्ये कमजोरी).

भारत मेनिंजायटिसमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत जगातील अव्वल तीन देशांमध्ये समाविष्ट आहे. तीव्र बॅक्टेरियल मेनिंजायटिसचे तीन प्रमुख कारणीभूत सूक्ष्मजंतुंपैकी निसेरिया मेनिंगिटिडिस उपचारानंतरही सुमारे १५ टक्के आणि उपचार न घेतल्यास ५० टक्क्यांपर्यंत मृत्यूदरासाठी जबाबदार आहे. भारतीय दोन वर्षांखालील मुलांमध्ये निसेरिया मेनिंगिटिडिस* संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचेही अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

डॉ. अमिता कौल, कन्सल्टंट पेडियाट्रिशियन आणि निओनेटोलॉजिस्ट, सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे यांच्या मते, “आपल्याकडे मेनिंजायटिसच्या सर्वात धोकादायक स्ट्रेन्सपासून संरक्षण देणाऱ्या लसी उपलब्ध आहेत आणि जागतिक पातळीवरील उपक्रमांमुळे प्रकरणांमध्ये मोठी घट झाली आहे. लसीकरण कार्यक्रम बळकट करणे आणि कुटुंबांना जागरूक करणे हे या अंतरावर मात करण्यास आणि टाळता येण्यासारख्या दुर्घटना रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नाजूक प्रतिकारशक्ती असलेली लहान मुले, तसेच गर्दीच्या ठिकाणी राहणारे विद्यार्थी आणि प्रवासी — अशा उच्च धोका असलेल्या गटांनी आपले आणि आपल्या सभोवतालच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण निश्चितपणे करावे.”

या घातक आजाराशी लढा देण्यासाठी, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) ९ ते २३ महिन्यांच्या मुलांना मेनिंगोकोकल लसीच्या दोन डोसांचे वेळापत्रक आणि 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या उच्च धोका असलेल्या व्यक्तींना एक डोस घेण्याची शिफारस करते.

आपले मूल ) ९ महिने किंवा त्याहून अधिक वयाचे असल्यास, त्याला इनवेसिव्ह मेनिंगोकोकल डिसीज विरोधात लसीकरण अवश्य करून घ्या.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ने २०३० पर्यंत बॅक्टेरियल मेनिंजायटिसची साथ संपवण्याचे उद्दिष्ट ठेवून एक ‘रोडमॅप’जारी केला आहे. यामध्ये लसीकरणाद्वारे टाळता येणारी प्रकरणे ५० टक्के आणि मृत्यू ७० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न आहे.

वर्ल्ड मेनिंजायटिस डेच्या निमित्ताने, चला आपल्या मुलांचे आणि समाजाचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा करूया. आज घेतलेली सक्रिय पावले उद्या अनेकांचे जीव वाचवू शकतात आणि सर्वांसाठी अधिक आरोग्यदायी भविष्य सुनिश्चित करू शकतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
76 %
0kmh
0 %
Wed
19 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!