31.1 C
New Delhi
Friday, September 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यस्तरीय 'कौशल्य मित्र' संमेलन

राज्यस्तरीय ‘कौशल्य मित्र’ संमेलन

इंडिया लिमिटेड व सीएसआर हेल्प यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य आयोजन


पुणे : सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी पारंपारिक शिक्षणाबरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज आहे. आज ६५ टक्के नोकऱ्या या कौशल्यावर आधारित देण्यात येत आहेत, त्यामुळेच कौशल्य आधारित शिक्षण ही काळाची गरज आहे, या साठी विविध कौशल्य विकसीत करणारे प्रशिक्षण युवकांना नागरिकांना समजून सांगणाऱ्या ‘कौशल्य मित्र’ समुपदेशकांची गरज आहे, असे मत विविध क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले.

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह संचलित राष्ट्रीय कर्तव्य अभियान अंतर्गत ॲस्पायर नॉलेज अँड स्किल इंडिया लिमिटेड व सीएसआर हेल्पलाइन तर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय कौशल्य मित्र संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञांनी तरुणांना आवश्यक असणाऱ्या कौशल्य विकास शिक्षणासंदर्भात चर्चा केली. 

या वेळी राष्ट्रीय कर्तव्य अभियान चे विजय वरूडकर, ॲस्पायर नॉलेज अँड स्किल इंडियाचे डॉ. संजय गांधी, लेखक प्रसाद मिरासदार, चैतन्य सॉफ्टवेअरचे संजय देशपांडे, प्रज्ञा देशपांडे, शासकीय योजनांचे समन्वयक डॉ. दयानंद सोनसाळे, देआसरा फाउंडेशनचे प्रकाश आगाशे, धैर्यशील कुटे आदी मान्यवर  उपस्थित होते.  सारिका शेठ, पौर्णिमा इनामदार, विशाल वरूडकर, अमित गांधी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. 

विजय वरूडकर यांनी वर्तमान परिस्थितीत शासकीय योजनांचा पाऊस असतो पण लोकांना त्याची माहिती नसते, भविष्यातील रोजगार स्वरूप बदलत आहेत. त्या साठी आवश्यक कौशल्य ही बदलत आहेत. कौशल्य मित्र नागरिकांमध्ये बदलत्या कौशल्य शिक्षणाचा प्रचार प्रसार करतील. तसेच विविध प्रकारे लोकांना प्रबोधन करतील असे त्यांनी सांगितले.

डॉ. संजय गांधी म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत अनेक अभ्यास क्षेत्रामध्ये कौशल्य विकास शिक्षण दिले जाते. त्याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवली पाहिजे. ग्रामीण भागातील तरुणांनी अधिकाधिक कौशल्य विकास शिक्षण घेतले तर खऱ्या अर्थाने आपण कौशल्यावर आधारित भारत निर्माण करू शकू. त्यामध्ये तरुण हे केवळ नोकऱ्या मागणारे नसतील तर उद्योगधंदे निर्माण करून नोकऱ्या देणारे असतील.

संजय देशपांडे म्हणाले, ई लर्निंग च्या माध्यमातून पारंपारिक शिक्षणाव्यतिरिक्त कौशल्य विकास शिक्षण पोहोचविणे शक्य आहे. लहान मुलांना कमी वयात कौशल्याची माहिती झाली, तर महाविद्यालयीन जीवनापर्यंत ते त्या कौशल्यामध्ये पारंगत होऊ शकतील त्यामुळे त्यांना केवळ पारंपारिक शिक्षणावर अवलंबून राहता येणार नाही. त्यातूनच आपण नवीन उद्योजक घडवू शकतो. यासाठी आम्ही स्किल स्कूल नावाचा प्रकल्प घेऊन तिसरीच्या विद्यार्थी पासून कौशल्य शिक्षण देण्याची योजना तयार केली आहे.

प्रसाद मिरासदार म्हणाले प्रत्येकामध्ये कोणते तरी कौशल्य आहे ते कौशल्य माहिती करून घेऊन त्या कौशल्याला योग्य पैलू पाडण्याचे काम आपण केले पाहिजे. कौशल्य आधारित शिक्षण दिले तर तरुणांमध्ये निश्चितच आत्मविश्वास निर्माण होतो आणि ते केवळ पारंपारिक शिक्षणावर आधारित नोकऱ्यांच्या मागे जात नाहीत. भारतामध्ये सर्वाधिक ६२% तरुण आहेत या तरुणांना कौशल्याच्या माध्यमातून योग्य दिशा देण्याची आज गरज आहे.

दयानंद सोनसाळे म्हणाले राज्य सरकार तरुणांना अधिक कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रम आणि अभ्यासक्रम तसेच कौशल्य प्रशिक्षण देत आहे यामध्ये विशेषतः विद्यार्थिनी आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला असून या माध्यमातून हजारो कौशल्य आधारित विद्यार्थी तयार झाले आहेत. याच विद्यार्थ्यांमधून अनेक उद्योजक घडले असून  त्यातून मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
66 %
1.5kmh
20 %
Fri
31 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °
Tue
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!