31.3 C
New Delhi
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रलोकसभेचा सर्वाधिक मताधिक्याचा पॅटर्न विधानसभेतही राहवा!- प्रा.‌डॉ. मेधाताई कुलकर्णी

लोकसभेचा सर्वाधिक मताधिक्याचा पॅटर्न विधानसभेतही राहवा!- प्रा.‌डॉ. मेधाताई कुलकर्णी

बाणेर मधील चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

लोकसभे निवडणुकीला मुरलीधर मोहोळ यांना बाणेर बालेवाडीतून २२ हजारांचे मताधिक्य मिळाले. हाच पॅटर्न कायम ठेवत विधानसभा निवडणुकीत प्रभाग ९ मधून सर्वाधिक मताधिक्य मिळाले पाहिजे, असा विश्वास खा. प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांनी व्यक्त केला. तसेच, भविष्याच्या दृष्टीने ही विधानसभा निवडणूक आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या बाणेर बालेवाडी तील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी, चंद्रकांतदादा पाटील, माधवजी भंडारी यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे,रिपाइंचे ॲड मंदार जोशी, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा कोथरूड उत्तर मंडलचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, प्रकाशतात्या बालवडकर, लहू बालवडकर, सनी निम्हण, राहुल कोकाटे, सागर बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूनम विधाते, संतोष पाषाणकर उपस्थित होते.

प्रा डॉ मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या की, बाणेर बालेवाडी या भागाने भाजपा-महायुतीवर भरभरुन प्रेम केले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मनात प्रचंड धाकधुक होती. कारण, त्यापूर्वी महापालिकेच्या माध्यमातून एका ठराविक भागातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पण २०१४ पासून या भागातून जे प्रेम आणि विश्वास मिळाला, तो अवर्णनीय आहे.‌ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही या प्रभागातून मुरलीधर मोहोळ यांना २२ हजारांचे मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकीत हाच पॅटर्न कायम ठेवला पाहिजे.

त्या पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या १० वर्षांत ज्या पद्धतीने विकासकामे संपूर्ण देशात राबविली आहेत, त्यामुळे आज संपूर्ण जगात देशाची प्रतिमा उंचावली आहे. याचा अनुभव आपल्याला परदेशात गेल्यावर आपल्याला सहज जाणवतो. त्यामुळे मोदीजींच्या विकास यात्रेत महाराष्ट्र ही असला पाहिजे. त्यासाठी विधानसभेत महायुतीचा प्रत्येक उमेदवार महत्वाचा आहे. लोकसभा निवडणुकीला अनेक ठिकाणी आपण गाफील होतो. त्यामुळे त्याचा फटका आपल्याला बसला आहे. वक्फ सारखा कायद्यात बदल करणं ही आवश्यकता आहे. त्यामुळे कोथरूड मधून चंद्रकांतदादा पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात केवळ विधानसभेची निवडणूक नसून, लोकसभेत जी आपली पिछेहाट झाली, त्यामुळे विरोधक एकप्रकारचा खोटा नॅरेटिव्ह सेट करु पाहत आहेत. तो खोडून काढण्यात हरियाणा, जम्मू काश्मीर यश मिळाले. महाराष्ट्रात हा खोटा नॉरेटिव्ह खोडून काढण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून सात हप्ते मिळाले. खरंतर ही योजना गेमचेंजर ठरणार आहे. या योजनेमुळे दोन कोटी २० लाख महिला आनंदात आहेत. असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, १९८२ पासून मी पुणे जवळून पाहत आहे. १९८२ च्या तुलनेत आज पुण्याची लोकसंख्या ७२ लाखांवर पोहोचली आहे. सध्या पुण्याच्या रस्त्यांवरुन ५३ लाख वाहने धावत आहेत.‌ यंदा दिवाळी पाडव्याला २१ हजार वाहने खरेदी झाली. त्यामुळे हा आकडा पाहता पायाभूत सुविधा वाढविण्यावर आमचा सातत्याने भर आहे. मेट्रो सारख्या प्रकल्पामुळे आज हजारो पुणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळले आहेत. चांदणी चौक सारख्या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या सुटण्यास मदत झाली आहे. २४×७ अंतर्गत समान पाणीपुरवठ्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून बाणेर मधील पहिली टाकी कार्यान्वित झाली आहे. विकासकामांची ही गती कायम राखण्यासाठी २२ तारखेला जास्तीत जास्त मतदान व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी भाजप नेते माधवराव भंडारी, अमोल बालवडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल उत्तम कळमकर यांचे भाजपा कोथरूड मंडलाच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी सचिन दळवी, उमाताई गाडगीळ, मोरेश्वर बालवडकर, विवेक मेथा, रोहन कोकाटे, अस्मिता करंदीकर, सुभाष भोळ, प्रमोद कांबळे, शिवम सुतार, रिपाइंचे संतोष गायकवाड, भाजपा नेत्या वंदना सिंह, कल्याणी टोकेकर, जागृती विचारे, सुरेखा वाबळे, प्रमोद कांबळे, उत्तम जाधव, अनिकेत चांदेरे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
31.3 ° C
31.3 °
31.3 °
41 %
6kmh
16 %
Sun
41 °
Mon
41 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
40 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!