21.1 C
New Delhi
Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रव्यापारी वर्गाच्या समस्या निवारणासाठी कटिबद्ध- आ. अण्णा बनसोडे यांची ग्वाही

व्यापारी वर्गाच्या समस्या निवारणासाठी कटिबद्ध- आ. अण्णा बनसोडे यांची ग्वाही


बनसोडे यांना विजयी करण्याचा सिंधी बांधव व व्यापाऱ्यांचा निर्धार

पिंपरी+ कॅम्पातील व्यापारी वर्गामध्ये वाहतूक कोंडी पार्किंग सुविधा नसणे यावरून काहीशी नाराजी होती. मात्र या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असल्याने आम्ही एक दिलाने आमदार बनसोडे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी केले. तर आपण कालही सिंधी बांधवांसाठी व व्यापारी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध होतो, आजही आहे आणि उद्याही कटिबद्ध राहील अशी ग्वाही पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरीत आयोजित या पत्रकार परिषदेत आमदार उमाताई खापरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व महायुतीचे समन्वयक योगेश बहल, आरपीआय आठवले गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष व जेष्ठ माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष कुणाल वावळकर, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, ज्येष्ठ उद्योजक व पिंपरी चिंचवड व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी, माजी नगरसेवक तुषार हिंगे, संदीप वाघेरे, जगन्नाथ साबळे, हरेश बोधानी, प्रसाद शेट्टी, शितल शिंदे, शैलेश मोरे, जगदीश शेट्टी, रोहित काटे, तसेच पिंपरी कॅम्प मधील व्यापारी किशोर केशवानी, लच्छू बूलानी, जयेश चौधरी, गोपाळ खत्री आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, अण्णा बनसोडे हे लोकांच्या अडचणीला धावून जातात त्यामुळेच मागील वेळी पिंपरी कॅम्प मधील व्यापाऱ्यांनी आग्रह करून अजित पवार यांच्याकडून त्यांच्यासाठी उमेदवारीचा आग्रह धरला. पिंपरी कॅम्पातील वाहतूक कोंडी पार्किंग सुविधा यावरून व्यापाऱ्यांनी उपमुख्यामंत्री अजित पवार यांच्यासमोर पार्किंग समस्या सोडवण्याबाबत आग्रही मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे प्रश्न मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले. त्यामुळे अण्णा बनसोडे आणि व्यापारी वर्गांमधील दुरावा दूर झाला आहे, मनोमिलन झाले आहे. असे बहल यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर असल्याचे सांगतात मात्र सामाजिक क्षेत्रात काम केल्याबद्दल अनेकांना अशी पदवी मिळते. अण्णा बनसोडे यांचे ड्राफ्टिंग चांगले आहे, अक्षर चांगले आहे ते शिक्षित आहेत. लोकांच्या समस्या समजून घेऊन कशा सोडवाव्यात हे त्यांना चांगलेच माहित आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावरून भांडवल करणे अयोग्य असल्याचे बहल यांनी सांगितले.
डब्बू आसवानी म्हणाले की, गेल्या दहा वर्षापासून पिंपरी कॅम्पात विशेषता राधिका, साई चौकात वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न आहे तो सोडवावा अशी आमची मागणी होती. अजित पवार यांनी याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले त्यामुळे अण्णा बनसोडे यांना बहुमताने निवडून देण्याच्या सर्व सिंधी समाज बांधव व व्यापाऱ्यांनी निर्धार केला आहआमदार बनसोडे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचा विकास केला हा विकास करताना सर्व जाती धर्माला विश्वासात घेऊन त्यांनी काम केले. त्यामुळे अजित पवार हे उमेदवार आहेत असे समजून काम करायचे सर्वांनी ठरविले आहे ज्या नेत्यांना आपण मानतो त्यांचा आदेश मानने महत्त्वाचे असते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
21.1 ° C
21.1 °
21.1 °
46 %
2.1kmh
0 %
Thu
27 °
Fri
27 °
Sat
28 °
Sun
30 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!