11.5 C
New Delhi
Thursday, January 8, 2026
Homeमहाराष्ट्रशहरातील प्रत्येक घराचे मोफत ''ड्रोन मॅपिंग''- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

शहरातील प्रत्येक घराचे मोफत ”ड्रोन मॅपिंग”- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे


मोठी घोषणा ; प्राधिकरणबाधित नागरिकांना मिळणार ”प्रॉपर्टी कार्ड”

निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

पिंपरी, (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड प्राधिकरण क्षेत्रातील बांधकाम व मिळकतींच्या मालकी हक्क प्रमाणपत्राचे ( प्रॉपर्टी कार्ड) महापालिका निवडणुकीनंतर वाटप करण्यात येईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगितले. याशिवाय शहरातील प्रत्येक घराचे ड्रोन मॅपिंग केले जाणार आहे. प्रत्येक प्लॉटवरील प्रत्येक घराचा सरकारी नकाशा गुगल क्लाऊडवर दिला जाणार आहे, ज्या माध्यमातून थेट आपल्या मोबाईलमध्ये आपल्या नकाशा दिसणार आहे. पाचशे वर्षानंतरही आपले घर आपल्याला गुगलवर दिसेल. ही सर्व प्रक्रिया मोफत केली जाणार आहे असे देखील बावनकुळे म्हणाले.

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने प्रभाग 17, 23 आणि 24 येथील उमेदवारांसाठी वाल्हेकरवाडी आणि थेरगाव येथे जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप उपस्थित होते. दरम्यान सभेसाठी प्रभाग 17 मधील आशा सूर्यवंशी, नामदेव ढोके, पल्लवी वाल्हेकर, सचिन चिंचवडे तर प्रभाग 23 मधील मनीषा प्रमोद पवार, तानाजी बारणे, सोनाली गाडे, अभिषेक बारणे आणि प्रभाग 24 मधील उमेदवार सिद्धेश्वर बारणे, करिष्मा बारणे, गणेश गुजर आणि शालिनी गुजर हे उमेदवार उपस्थित होते.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पिंपरी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेमध्ये प्रॉपर्टी कार्डचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मी राज्यामध्ये तुकडा बंदी कायदा अंमलबजावणी केली . या कायद्यामुळे गुंठा, दीड गुंठा जागेमध्ये बांधलेल्या घरांची सरकार दरबारी नोंदणी करणे शक्य झाले. महापालिका निवडणुका झाल्यानंतर आपण आमदार शंकर जगताप यांनी मागणी केल्याप्रमाणे सर्व घरांचे प्रॉपर्टी कार्ड करून घेणार आहोत. मी स्वतः या प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यासाठी शहरात येणार आहे. याशिवाय आपण येथील घरांचे ड्रोन मॅपिंग देखील करणार आहोत. येथील प्रत्येक घराचे ड्रोन मॅपिंग करून प्रत्येक प्लॉटचा सरकारी नकाशा आम्ही गुगल क्लाऊड वर देणार आहोत. ज्या माध्यमातून गुगलवर नाव टाकल्यानंतर घराचा नकाशा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. यातून एक महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज तयार होणार आहे. ज्याचा फायदा प्रत्येक नागरिकाला होणार आहे. सरकार विशेष बाब म्हणून या सर्व घरांचे ड्रोन मॅपिंग करून नागरिकांना मोफत प्रॉपर्टी कार्ड देणार आहे. त्यामुळे यापुढील काळात तहसीलदाराकडे चकरा मारावे लागणार नाही. याचा लाखो परिवाराला दिलासा मिळणार आहे. हे निर्णय होण्यासाठी येत्या 15 जानेवारी रोजी भाजपला आपले मतदान महत्त्वाचे आहे. असे देखील बावनकुळे म्हणाले.

यावेळी निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी 2017 पासून शहरांमध्ये भाजपच्या माध्यमातून झालेल्या प्रगतीचा आलेख महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडला. आगामी काळातही पिंपरी चिंचवड महापालिकेला प्रगतीच्या मार्गावर कायम ठेवण्यासाठी भाजपच्या माध्यमातून ”विकासाचे व्हिजन” साध्य करायचे आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना 15 जानेवारी रोजी मतांच्या रूपाने पाठिंबा द्यावा असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले


*बचत गटांना मिळणार लाखाचे अनुदान *

नागपूरमध्ये जशी महिला बचत गटांना अनुदान योजना उपलब्ध करून दिली गेली. त्याच प्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही अनुदान योजना राबवण्यात येणार आहे असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी सांगितले. निवडून आल्यावर शहरातील महिला बचत गटांना प्रत्येकी 1 लाख रुपये अनुदान प्रदान केले जाईल.मुख्य म्हणजे लाडकी बहीण योजना भाजपचे सरकार असेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे देखील बावनकुळे यावेळी म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
11.5 ° C
11.5 °
11.5 °
45 %
2.2kmh
0 %
Thu
19 °
Fri
21 °
Sat
21 °
Sun
20 °
Mon
17 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!