31.1 C
New Delhi
Wednesday, May 20, 2026
Homeमहाराष्ट्रसदानंदाचा येळकोट….च्या गजरात धामणीला म्हाळसाकांत खंडोबाची यात्रा सुरु

सदानंदाचा येळकोट….च्या गजरात धामणीला म्हाळसाकांत खंडोबाची यात्रा सुरु

हजारो भाविकांनी घेतले दर्शन…. मंचर :पुणे.नगर.नाशिक मुंबई जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेल्या आंबेगांव तालुक्यातील धामणी येथील श्रीक्षेत्र श्री म्हाळसाकांत खंडेरायाचे हजारो भाविकांनी रविवार (१ फेब्रुवारी २६) दर्शन घेतले.सदानंदाचा येळकोटचा जयघोष आणि भंडारा खोबर्‍याची उधळण करण्यात आली.खेड.आंबेगांव.जुन्नर पारनेर.सिन्नर.हवेली.शिरुर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने धामणीच्या खंडोबाच्या यात्रेला आले होते

.रविवारी पहाटे मुख्य मंदिरातील स्वयंभू सप्तशिवलिंगाचा रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक देवस्थानाचे मानकरी.सेवेकरी भगत तांबे.वाघे मंडळीनी केल्यानंतर स्वयंभू सप्तशिवलिंगावर पंचधातूच्या सर्वांगसुंदर लोभस खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या मुखवट्यांची प्रतिष्ठापना करुन देवाच्या मुखवट्यांना वस्रालंकार घालण्यात आले.पूर्वमुखी खंडेराय.म्हाळसाई व बाणाईच्या व उत्तरमुखी खंडोबाची बहीण जोगेश्वरीच्या मूर्तीना वस्रालंकार घालण्यात आले.त्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत.सुभाष तांबे.प्रभाकर भगत.धोंडीबा भगत.ज्ञानेश्वर भगत.शांताराम भगत.नामदेव भगत.पांडुरंग भगत.माऊली वाघे.दिनेश जाधव.अनिरुध्द वाळुंज.बाळकृष्ण साळगट.या सेवेकरी मंडळीनी खंडोबाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करुन पारंपारिक पूजा केली त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली यावेळी महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती.पारंपारिक पूजेनंतर देवाचे दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले.

मंदिर व परिसरात आळे पाडळी (तालुका पारनेर) येथील थोरात बंधूच्या सौजन्याने आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर व परिसर झळाळून गेला होता.मंदिराच्या गाभार्‍यात व मंदिराभोवती आकर्षक फुलांची सजावट केलेली होती.भाविकांकडून तळी भंडाराची उधळण करुन नवसपूर्तीचे जागरण गोंधळ घालण्यात येत होते.भाविकांनी यात्रेच्या घाटातून नवसाचे बैलगाडी शर्यतीचा आनंद लुटला.यात्रेत भाविकांनी जिलेबी.भजी.शेवचिवडा शेव रेवडीचा स्वाद घेतला.माही पुनवेच्या यात्रेतील जिलेबी भजी शेव रेवडीची चव वेगळीच असते.लहान मुलांनी पाळण्यात बसण्याचा आनंद घेतला.तसेच शेतकर्‍यांनी शेतीसाठी लागणारी अवजारे खरेदी केली.मुंबई.पुणे.पिंपरी चिंचवड व अन्य शहरात नोकरी आणि व्यवसायानिमित्ताने बाहेर असलेले चाकरमानी आपल्या कुटुंबासह व मित्रमंडळीसह यात्रेला हजेरी लावून त्यांनी यात्रेचा आनंद लुटला.आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पुणे.पिंपरी चिंचवड.मुंबई.नवी मुंबई या महानगरातील भाविकांनी सकाळपासूनच देवाचे दर्शनासाठी गर्दी केलेली होती त्यामुळे भाविकांमध्ये उत्साह जाणवत होता.मंदिर परिसरात अनेक व्यापार्‍यांनी भंडारा.खोबरे व फुलांची पेढे विक्रीची दुकाने लावली होती.सकाळी धामणी.लोणी.शिरदाळे.पहाडदरा.खडकवाडी.महाळुंगे.गावडेवाडी. जारकरवाडी पाबळ या गावातील ग्रामस्थ व भाविकांनी पारंपारिक वाद्याच्या सुरात व ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूकीने देवास हारतुरे.मांडवडहाळे.व नैवेद्य अर्पण केले.धामणीच्या पेठेतून नवसाच्या बगाडाची मिरवणूक काढण्यात आली लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या चाळीस हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभामुळे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सेवा चांगल्या प्रकारे देवस्थानाने उपलब्ध करुन दिलेली होती पुणे जिल्ह्यात धामणीच्या खंडोबा देवाचा बैलगाडा शर्यतीचा घाट प्रसिध्द आहे.या घाटातून नवसपूर्तीचे बैलगाडे पळवण्यात येतात.थापलिंग.धामारी. धामणी येथील खंडोबाच्या यात्रेपासून जिल्ह्यातील गावोगावच्या ग्रामदेवतेच्या यात्रेला सुरुवात होते.धामणीच्या खंडोबाच्या यात्रेच्या पहिल्या दिवशी (रविवारी) घाटातून नवसाचे बैलगाडे धावले. भाविकांनी बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला.यात्रेनिमित्त उपविभागीय पोलीस अधिक्षक अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली व पारगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांचे मार्गदर्शनाखाली यात्रेत पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.यात्रेत कोणतीही अनूचित घटना घडू नयेत यासाठी पोलीसांनी दंगल नियंत्रण पथक सज्ज ठेवलले होते.दोन दिवस यात्रेनिमित्त बंदोबस्त ठेवण्यासाठी पन्नास पोलीस कर्मचारी उपस्थित होते.यात्रेची व्यवस्था देवस्थान.सेवेकरी व ग्रामस्थ व सर्व संस्थाचे पदाधिकारी यात्रा कमेटी व गावातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहीली.मंदिर व परिसरातील व्यवस्था देवस्थान व सेवेकरी मंडळी आणि धामणी.लोणी.शिरदाळे.पहाडदरा ज्ञानेश्वर वस्ती येथील ग्रामस्थांनी यात्रेची व्यवस्था पाहीली.आरोग्य विभागाने आरोग्याच्या सुविधा पुरविल्या देवस्थानाचे वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाण्याची सेवा उपलब्ध केलेली होती

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
29 %
1.5kmh
0 %
Wed
45 °
Thu
45 °
Fri
44 °
Sat
45 °
Sun
46 °

Most Popular

Recent Comments