10.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्र२ हजार ८४५ अनधिकृत बांधकामे निष्कासित

२ हजार ८४५ अनधिकृत बांधकामे निष्कासित

पिंपरी,: चिखली येथील कुदळवाडी भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम निष्कासनाच्या मोहिमेअंतर्गत आज अखेरपर्यंत २०२ लाख २९ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेली २ हजार ८४५ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान ४६५ एकर भूभागावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ फेब्रुवारी २०२५ पासून कुदळवाडी येथे अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने आणि इतर अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. आज मोहिमेच्या पाचव्या दिवशी, सुमारे ९३ एकर भूभागावर पसरलेल्या ४० लाख ५७ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या ५२८ अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

आजच्या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सुचेता पानसरे, अमित पंडित, किशोर ननवरे, महेश वाघमोडे, अजिंक्य येळे, शितल वाकडे, श्रीकांत कोळप यांच्यासह कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि कर्मचारी सहभागी झाले. याशिवाय सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर निष्कासनासाठी करण्यात आला. तसेच महापालिकेचे ४ कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस कर्मचारी आणि मजूर यांचा देखील यामध्ये समावेश होता. सुरक्षेसाठी ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
10.1 ° C
10.1 °
10.1 °
87 %
1kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!