पुणे, – माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरात झालेल्या भीषण बस अपघातात पुण्यातील भोसरी येथील सावन आयबी प्रा लि.कंपनीत कार्यरत असलेले कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल केंद्रामध्ये तातडीने आवश्यक शस्त्रक्रिया व वैद्यकीय उपचार करण्यात आले आहे. या ४२ रुग्णांपैकी २७ पुरुष व १५ महिला आहेत. यामध्ये हाडांच्या २५ शस्त्रक्रिया, चेहऱ्यावरील आणि जबड्यांच्या ३ शस्त्रक्रिया आणि ११ रुग्णांवर सामान्य शस्त्रक्रिया व उपचार सुरू आहेत. सद्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून सर्व रुग्ण धोक्या बाहेर आहेत.
भोसरी येथून कर्मचारी सहलीसाठी निघाले. एका खासगी बसने पुणे ते काशीद असा प्रवास करत होते. मौजे सणसवाडी, ता. माणगाव हद्दीतील ताम्हिणी घाटात काल (शुक्रवार ०२ जानेवारी २०२६) सकाळी अंदाजे ११.१५ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस एका कार ला धडक देत डोगराच्या खडकावर आदळली, सदर बसचा भीषण अपघात झाला. या बसमध्ये अंदाजे ५० प्रवासी प्रवास करत होते.
या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर ४२ जखमींना रात्री ९ वाजता डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल संशोधन केंद्र, पिंपरी पुणे येथे तातडीने दाखल करण्यात आले आहे. दाखल सर्व रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक शस्त्रक्रिया व वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
डॉ. भाग्यश्री पाटील, प्र कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे (अभिमत विद्यापीठ), म्हणाले, “अपघातानंतर रुग्णांवर योग्य वेळी उपचार होणे फार महत्त्वाचे असते. त्यासाठी आधीपासून तयारी असणे आणि सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे असते. अपघाताची माहिती मिळताच आमच्या रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि सर्व कर्मचारी एकाच वेळी कामाला लागले, त्यामुळे प्रत्येक रुग्णाला कोणताही उशीर न होता तात्काळ उपचार आणि आवश्यक तज्ज्ञांची मदत मिळू शकली.”
अपघात ग्रस्त रुग्ण उपचारासाठी येणार असल्याची माहिती मिळताच रुग्णालयाची संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्यात आली. रुग्णालयातील अनुभवी डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, नर्सिंग टीम तसेच आपत्कालीन सेवा पूर्ण क्षमतेने व समन्वयाने कार्यरत असून, २४ तास अखंड रुग्णसेवा दिली जात त्यासाठी आम्ही सक्षम आहोत असे डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी पुणे, तसेच ते पुढे म्हणाले अपघातातील सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी व त्यांना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. रेखा आर्कोट, अधिष्ठाता, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे. म्हणाले “मोठ्या संख्येने ट्रॉमा रुग्ण दाखल होत असताना त्यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी रुग्णालयातील क्लिनिकल प्रणाली तात्काळ कार्यान्वित करण्यात आली. रुग्णांची नोंदणी व प्रक्रिया अतिशय वेगाने पूर्ण करून त्यांना संबंधित तज्ज्ञ विभागांकडे वर्ग करण्यात आले, ज्यामुळे तपासण्या, तज्ज्ञ सल्ले आणि उपचारांचे नियोजन शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने करता आले. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रुग्णालयातील नियमित आरोग्य सेवांवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही.”
डॉ. एच. एच. चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे म्हणाले,“रुग्णालयात दाखल होताच सर्व रुग्णांना तातडीने उपचार देण्यात आले. विविध तज्ज्ञ विभागांच्या समन्वयातून आवश्यक वैद्यकीय व शस्त्रक्रियात्मक उपचार सध्या विविध वैद्यकीय शाखेतील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या सर्व उपचारांना रुग्णांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.”
डॉ. सरबरी स्वैका, प्रमुख, आपत्कालीन वैद्यकीय विभाग, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे,“अपघातग्रस्त रुग्ण दाखल होताच त्यांची तातडीने प्राथमिक तपासणी करण्यात आली. आवश्यक सर्व वैद्यकीय तपासण्या करून वेळेत तज्ज्ञांकडून वैद्यकीय मूल्यांकन करण्यात आले. अपघातग्रस्त रुग्णांचे जास्त करून हाड मोडण्याचे तक्रारी, चेहरा व जबडा शस्त्रक्रिया तसेच सामान्य शस्त्रक्रिया विभागांमध्ये वर्ग करून तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. आमच्या विभागाची संपूर्ण टीम सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधत अखंड सेवा देत आहे.”


