28.8 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeमहाराष्ट्रकीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगतर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेवर 110 कॉपीराइट नोंदणी

कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगतर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेवर 110 कॉपीराइट नोंदणी

पुणे : कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगने एक ऐतिहासिक कामगिरी बजावत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या क्षेत्रात तब्बल ११० कॉपीराइट्स नोंदवले आहेत. या कॉपीराइटेड कामांमध्ये संशोधन लेख, एआय-आधारित सॉफ्टवेअर कोड्स, विषयवार प्रेझेंटेशन स्लाईड्स, शैक्षणिक व्हिडिओज, पोस्टर्स, कविता आणि एआयवरील ब्लॉग्ज यांचा समावेश आहे.

या सर्व कार्याचे एकत्रित संकलन असलेली विशेष पुस्तिका स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित सोहळ्यात अनावरण करण्यात आली. या अनावरणाचे मानकरी होते पद्मश्री डॉ. संजय जी. धांडे, (माजी संचालक आयआयटी कानपूर व विद्यमान कुलगुरू, अवंतिका विद्यापीठ, उज्जैन) जे या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते.

या सोहळ्याला मिलिंद इनामदार, अध्यक्ष (President), Cyret Technologies हे Guest of Honor म्हणून उपस्थित होते.

आपल्या मनोगतात डॉ. संजय धांडे यांनी कीस्टोन संस्थेचे अभिनंदन करताना म्हटले की, ही संस्था शिक्षक व विद्यार्थ्यांना नव्या युगातील कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रेरित करून एक आदर्श प्रस्थापित करत आहे.

डॉ. धांडे यांनी पुढे नमूद केले की, “देशाला सध्या संरक्षण तंत्रज्ञानात (Defense Technology) नवोन्मेषी विचारांची नितांत गरज आहे. अभियांत्रिकी शिक्षणामध्ये संरक्षण तंत्रज्ञानाशी संबंधित विशेष कार्यक्रम सुरू करण्याची आवश्यकता आहे. अशा उपक्रमांमुळे भारताची सामरिक आणि सुरक्षाविषयक क्षमता अधिक बळकट होईल.”

डॉ. संदीप कदम, प्राचार्य, कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, म्हणाले की, “तंत्रज्ञान आपल्याला अपेक्षित असलेल्या वेगापेक्षा कितीतरी जलद गतीने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे संपूर्ण अभियांत्रिकी क्षेत्रात नवा क्रांतिकारी बदल घडत आहे. कीस्टोन संस्था या परिवर्तनाला सामोरे जाण्यास कटिबद्ध असून प्राध्यापकांना सतत प्रेरित करत आहे. ही संपूर्ण उपक्रमश्रृंखला त्याच उद्दिष्टाचा एक भाग आहे.”

संस्थापक संचालक प्रा. यशोधन सोमन यांनीही मनोगतात सांगितले की, “कीस्टोन संस्था कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्यांसाठी Center of Excellence, उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे उपलब्ध ऑनर कोर्सेस अशा विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे. याशिवाय, Illinois Tech University, Chicago (USA) व Malaysia University of Science and Technology, Kuala Lumpur (Malaysia) या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर तसेच उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांबरोबर सहयोग सुरू आहे. या सहयोगातून सहकार्यात्मक प्रशिक्षण, संशोधन व विकास यावर संस्थेचा भर आहे.”

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन प्रा. सुवर्णा फुले, प्रा. पंकज करांडे व प्रा. दीपाली मिसाळ यांनी केले.

या वेळी अंकित लुनावत, डॉ. प्रशांत कसबे, मिलिंद इनामदार, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही ऐतिहासिक कामगिरी कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या संशोधन, नाविन्य व तंत्रज्ञानप्रधान शिक्षणाच्या बांधिलकीचे प्रतिक आहे. संस्था विद्यार्थ्यांना एआय आणि संरक्षण तंत्रज्ञानावर आधारित भविष्याची तयारी करून देण्याच्या आघाडीवर आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
28.8 ° C
28.8 °
28.8 °
35 %
4.4kmh
0 %
Thu
29 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!