मंचर :देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था पुणे चे वतीने दिला जाणारा मानाचा” ऋग्वेद पुरस्कार “धामणी (तालुका आंबेगांव)येथील पुरातन श्रीराम देवस्थानचे प्रमुख वेदमूर्ती मंदार मधुकर क्षीरसागर यांना राज्यसभेच्या सदस्या खासदार सौ.मेधाताई कुलकर्णी आणि जेष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते देण्यात आला.वेदमूर्ती मंदार क्षीरसागर यांचे ऋग्वेद सदशग्रंथ ऋग्वेदाचे अध्ययन झाले आहे.नुकतेच त्यांचे श्री सद्गुरु बाबा महाराज सहस्त्रबुद्धे समाधी मंदिर येथे संपूर्ण ५१ दिवस कंठस्थ ऋग्वेद घन पारायण संपन्न झाले.वेदवारिधी,वेदकलानिधी, ऋग्वेदनिधी इ.पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. देशस्थ ब्राह्मण संस्थेतर्फे कायम अश्या वेदव्रतींचा सन्मान केला जातो. नुकताच(दि.११ जानेवरीला) लोकमान्य सभागृह केसरीवाडा या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी खासदार मेधाताई कुलकर्णी, राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर,अनलायझर जे संस्थापक सुशील कुलकर्णी,संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, सुनील पारखी,संस्थेचे सर्व विश्वस्त कार्यक्रमाला उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगराचे तत्कालीन संघचालक व तत्कालीन प्रांत प्रचारक प्रमुख कै रघुवीरजी क्षिरसागर यांचे वेदमूर्ती मंदार क्षिरसागर हे नातू आहे.
धामणीच्या वेदमूर्ती मंदार क्षिरसागर यांना ॠग्वेद पुरस्कार प्रदान
RELATED ARTICLES
New Delhi
fog
6.1
°
C
6.1
°
6.1
°
93 %
0kmh
40 %
Tue
20
°
Wed
21
°
Thu
22
°
Fri
23
°
Sat
24
°


