25.1 C
New Delhi
Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रश्रीराम प्रॉपर्टीज लिमिटेडचा पुण्यात विस्तार

श्रीराम प्रॉपर्टीज लिमिटेडचा पुण्यात विस्तार

पुणे – : अग्रगण्य मिड-मार्केट आणि मिड-प्रीमियम केंद्रित निवासी रिअल इस्टेट डेव्हलपर श्रीराम प्रॉपर्टीज लिमिटेडने (एसपीएल) पुण्यातील हिंजवडी येथील अत्यंत मागणी असलेल्या मायक्रो मार्केटमध्ये सुमारे ७ लाख चौरस फूट प्रीमियम निवासी प्रकल्पाच्या विकासासाठी संयुक्त विकास करारावर (जेडीए) स्वाक्षरी केली आहे.

एसपीएलचा पुण्यातील हा दुसरा प्रकल्प असून भारतातील सर्वांत गतिमान रिअल इस्टेट हबमध्ये विस्तार करण्याची आणि जोरदारपणे स्थिर होण्याची तिची कटिबद्धता यातून अधोरेखित झाली आहे. कंपनीने मे २०२५ मध्ये उंड्री येथे स्वतःच्या पहिल्या प्रकल्पासह पुण्याच्या बाजारपेठेत प्रवेश केला होता. त्याला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून लाँचिंगच्या सहा महिन्यांतच त्याची ५५ टक्क्यांपेक्षा अधिक विक्री झाली आहे.

कंपनी आता पुण्यातील हिंजवडी येथे दुसरा प्रकल्प सुरू करत आहे. हा प्रकल्प शहरी राहणीमान आणि जीवनशैली अनुभवांची नव्याने व्याख्या करणारा हाय-राइज संमिश्र वापर विकासाच्या स्वरूपात आहे. या प्रकल्पात ६.५ लाख चौरस फूट प्रीमियम अपार्टमेंट्स असून त्याला विचारपूर्वक डिझाईन केलेल्या किरकोळ आणि व्यावसायिक जागांची जोड मिळाली आहे. हे एकूण ७ लाख चौरस फुटांपेक्षा जास्त विक्रीयोग्य क्षेत्र आहे. या प्रकल्पात सुमारे ७०० कोटी रुपयांची जीडीव्ही क्षमता आहे.

मोठी मागणी असलेल्या निवासी कॉरिडॉरमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेले हे उत्पादन व्हर्टिकल लिव्हिंगमध्ये नवीन बेंचमार्क स्थापन करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. या प्रकल्पामध्ये एक स्काय क्लबहाऊस असेल, त्यातून शहराची विहंगम दृश्ये, विशेष विश्रांती सुविधा आणि रहिवाशांचा अनुभव उंचावणाऱ्या सामाजिक स्पेसेस उपलब्ध होतील. त्याचे मोक्याचे स्थान, एकात्मिक डिझाईन आणि समकालीन आर्किटेक्चर यांमुळे हिंजवडीमधील एक महत्त्वपूर्ण गंतव्यस्थान म्हणून हा प्रकल्प डोळ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. अॅसेट-लाईट विकास प्रारूपाच्या माध्यमातून भौगोलिक विविधता आणि भांडवल-कार्यक्षम वाढीसाठी एसपीएलची कटिबद्धता या नवीन प्रकल्पातून बळकट झाली आहे.

पुण्यातील सर्वात मोठा आयटी आणि व्यावसायिक भाग म्हणून ओळखली जाणारी हिंजवडी शहरातील सर्वात पसंतीच्या निवासी ठिकाणांपैकी एक म्हणून उदयास आली आहे. दमदार रोजगाराचे वातावरण, उत्कृष्ट दळणवळण आणि बळकट सामाजिक संरचना यांची त्यामागे चालना आहे. स्थिर भाडे उत्पन्न आणि हिंजवडी आयटी पार्क, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जवळच असलेल्या प्रमुख शैक्षणिक आणि आरोग्य सेवा संस्था यांमुळे घरांची मागणी कायम राहिल्याने हे मायक्रो-मार्केट अंतिम वापरकर्ते आणि गुंतवणूकदार दोघांनाही आकर्षित करत आहे.

पुण्यातील आपल्या पहिल्या प्रकल्पाला मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादाने भारावून जाऊन या प्रकल्पाच्या माध्यमातून श्रीराम प्रॉपर्टीज पश्चिम विभागात आपले पोर्टफोलिओ आणखी मजबूत करत आहे. दक्षिण भारतातील मिड-मार्केट हाऊसिंग सेगमेंटमध्ये आपले नेतृत्व कायम ठेवतानाच पुण्यातील उच्च-वाढीच्या मायक्रो-मार्केटमध्ये आपला विस्तार करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे.

श्रीराम प्रॉपर्टीजचे उपाध्यक्ष (बिझनेस डेव्हलपमेंट) अक्षय मुरली म्हणाले, ‘पुण्यातील भरभराटीला आलेल्या आयटी आणि औद्योगिक वातावरणामुळे येथे भरपूर मागणी आहे. आमच्या दुसऱ्या प्रकल्पाचा करार करणे हा आमच्या विस्ताराच्या धोरणातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. या शहराच्या दीर्घकालीन क्षमतेवरील आमचा विश्वास त्यातून प्रतिबिंबित होतो. पुण्यात आमची उपस्थिती मजबूत करताना आम्हाला आनंद होत आहे. परवडणारी, उच्च गुणवत्तेची घरे पुरविण्यावर लक्ष केंद्रित करतानाच भागीदारी आणि विकास सहयोगाच्या माध्यमातून प्रमुख निवासी बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याच्या श्रीराम प्रॉपर्टीजच्या व्यापक वाढीच्या धोरणाशी हा नवीनतम प्रकल्प सुसंगत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
25.1 ° C
25.1 °
25.1 °
88 %
1.5kmh
40 %
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!