मंचर : कार्तिक महिण्यातील देवदिवाळी. त्रिपुरारी पौर्णिमा.कार्तिक स्नान समाप्ती.व तुलसी विवाह समाप्ती व हरीहर भेटीनिमित्त धामणी (तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात बुधवारी(५नोव्हेंबर २५) खंडेरायाची पारंपारिक अष्टदल धान्य. फूल —फळ पुजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.खंडोबाच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी पाहावयास मिळाली.कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे स्वयंभू सप्तशिवलिंगाचा व खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या सर्वांगसुंदर लोभस मुखवट्याचा दुग्धाभिषेक व पंचामृताने रुद्राभिषेक करण्यात आला.पारंपारिक अष्टदल धान्य—कडधान्य फूल.फळ.महापुजा पारंपारिक वाद्याच्या गजरात अकरा जोडप्यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी मंदिराच्या गाभार्यात फुलांची आकर्षक सजावट केली होती.बुधवारी पहाटे सुवासिक फुलांने सजवलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यांना सुवासिक भंडार्याचा लेप लावलेला होता.खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या वस्त्रालंकाराने सजवलेल्या व नटवलेल्या लोभस मूर्ती. मानकरी पंचरास मंडळीचा पारंपारिक वाद्याचा गजर.मोगर्याच्या व दवण्याच्या अत्तराच्या सुंगधाने दरवळून गेलला मंदिर परिसर.सदानंदाचा येळकोट असा जयघोष करणारे भाविक.आणि आबालवृध्द व त्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग हे सगळे भक्तिमय वातावरण कार्तिक महिण्यातील पौर्णिमेला भगवान विष्णू व भगवान शंकराची “हरिहर “भेट होते.या शुभदिनी पारंपारिक अष्टदल धान्य फूल व फळ पूजा सोहळ्याच्या निमित्ताने धामणीच्या खंडोबा देवस्थान मंदिरात दिसून आले.मंदिराच्या गाभार्यात व सभामंडपात मोगर्याचे व झेंडू अष्टरच्या फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. मंदिराचे गाभार्यात व सभामंडपात करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई.व सुरेख रांगोळी आणि पारंपारिक वाद्याच्या निनादाने व पुरातन घंटेच्या गजराने आणि सदानंदाचा येळकोटच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भल्या पहाटे भक्तिमय झाला होता.

शेकडो प्रज्वलीत केलेल्या पणत्यांने मंदिर परिसर उजळून निघालेला होता. यावेळी मंदिराच्या बाहेर फटाक्याचीआतषबाजी करण्यात आली उपस्थितांच्या कपाळावर भंडार्याचा मळवट लावून हरिनामाच्या गजरात आबालवृध्द भाविक सहभागी झालेले होते.नितेश राजगुरु व सौ तेजस्विनी राजगुरु(अवसरी खुर्द.ता.आंबेगांव)सुरेश डोके व सौ.अलका डोके(खडकवाडी. लोणी)प्रशांत कांदळकर व सौ.आशा कांदळकर (कवठे यमाई.ता.शिरुर)विजय गावडे पाटील व सौ.अंकिता गावडे पाटील(वाघाळे.ता.शिरुर) दत्तात्रय जाधव व सौ पूनम जाधव (जाधववाडी.ता.आंबेगांव)विशाल धुमाळ व सौ वनिता धुमाळ.(धुमाळस्थळ. लोणी)विश्वजित धुमाळ व सौ कांचन धुमाळ (खडकवाडी लोणी)विवेक बढेकर व सौ तेजस्वी बढेकर (जारकरवाडी) लक्ष्मण सोनवणे व सौ.वर्षा सोनवणे (धामणी)विठ्ठल बढेकर व सौ सविता बढेकर (धामणी) आणि युवराज बढेकर व सौ वंदना बढेकर(धामणी) या अकरा दाम्पंत्याच्या हस्ते सप्तशिवलिंगाला दुग्धाभिषेक व त्यानंतर पंचामृताने रुद्राभिषेक करुन अष्टदल धान्य फूल फळ पूजा करण्यास सुरुवात करण्यात आली.

महाआरती झाल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत.प्रभाकर भगत.सुभाष तांबे.धोंडीबा भगत.शांताराम भगत.नामदेव भगत.पांडुरंग भगत.राजेश भगत.राहुल भगत.बाळशिराम साळगट.अनिरुध्द वाळूंज.प्रमोद देखणे यांनी स्वयंभू सप्तशिवलिंगावर सुंगधी अत्तर व अष्टदल धान्य फूले व फळे पारंपारिक पध्दतीने अर्पण केली.मंदिराच्या गाभार्यात व सभामंडपात फुलांची सजावट केलेली होती खंडोबाला नैवेद्य म्हणून सरत्या दिवाळीचा फराळ.व तांदूळ.ज्वारी.गहू.बाजरी.हरबरा डाळ.हिरवे मूग.मटकी.हुलगे.ही अष्टदल धान्य व कडधान्य महिला भाविक देवापुढे श्रध्देने ठेवत होत्या.कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शनासाठी परिसरातील गावडेवाडी.अवसरी खुर्द.महाळूंगे पडवळ.तळेगांव ढमढेरे.लोणी.संविदणे.खडकवाडी.वडगांवपीर.पाबळ.मरकळ येथील भाविकांनी गर्दी केलेली होती.


