मंचर :धामणी – येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात मंगळवारी(७आँक्टो २५) खंडेरायाची पारंपारिक दवणा.फूल —फळ पुजा संपन्न झाली.आश्विन महिण्यातील आकाश दिपदान.कुलधर्म.लक्ष्मी व इंद्रपूजन अन्वाधान कार्तिक स्नानारंभ निमित्ताने पहाटे स्वयंभू सप्तशिवलिंगाचा व खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या सर्वांगसुंदर लोभस मुखवट्याचा दुग्धाभिषेक व पंचामृताने रुद्राभिषेक करण्यात आला.पारंपारिक दवणा.फूल.फळ.महापुजा पारंपारिक वाद्याच्या गजरात अकरा जोडप्यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी मंदिराच्या गाभार्यात फुलांची आकर्षक सजावट केली होती.मंगळवारी पहाटे सुवासिक फुलांने सजवलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यांना सुवासिक भंडार्याचा लेप लावलेला होता.खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या वस्त्रालंकाराने सजवलेल्या व नटवलेल्या लोभस मूर्ती. मानकरी पंचरास मंडळीचा पारंपारिक वाद्याचा गजर.मोगर्याच्या व दवण्याच्या अत्तराच्या सुंगधाने दरवळून गेलला मंदिर परिसर.सदानंदाचा येळकोट असा जयघोष करणारे भाविक.आणि आबालवृध्द व त्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग हे सगळे भक्तिमय वातावरण आश्विन पौर्णिमेला पारंपारिक दवणा.फूल.व फळ पूजा सोहळ्याच्या निमित्ताने धामणी खंडोबा देवस्थान मंदिरात दिसून आले.मंदिराच्या गाभार्यात व सभामंडपात मोगर्याचे व झेंडू अष्टरच्या फुलांच्या माळा घातलेल्या होत्या.आकर्षक विद्युत रोषणाई.वाद्याचा व घंटेचा गजर आणि सदानंदाचा येळकोटच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर पहाटे भक्तिमय झाला होता.कपाळावर भंडार्याचा मळवट लावून हरिनामाच्या गजरात आबालवृध्द भाविक सहभागी झालेले होते.