24.7 C
New Delhi
Monday, October 13, 2025
Homeमहाराष्ट्रडॉ. आंबेडकर यांनी देशाला नवी दिशा देण्याचे कार्य केले-प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड...

डॉ. आंबेडकर यांनी देशाला नवी दिशा देण्याचे कार्य केले-प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वीं जयंती साजरी


पुणे,- : ” भारत देशाला नवी दिशा देण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांनी केले आहे. भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरेचा धागा पकडून त्यांनी संपूर्ण मानव जातीचा उद्धार केला आहे. सदगुणांची पूजा हीच ईश्वर पूजा आहे.” असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
प्रबुद्धनायक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वीं जयंती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने कोथरूड येथील विद्यापीठाच्या परिसरात साजरी केली. या वेळी विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी आपले विचार व्यक्त केले.
या प्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, डॉ. विश्वजीत नागरगोजे, प्रा.डॉ. दत्ता दंडगे, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. विनोद जाधव उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,”  संपूर्ण जगात भारताची ओळख ही म. गांधी, भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पंचशील जीवनात उतरावे.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,” युगपुरूष डॉ. आंबेडकर यांना केवळ ६५ वर्षांचे जीवन लाभले खरे परंतू त्यांचे कार्य अद्वितीय आहे. यातील ३५ वर्ष शिक्षणात गेले. त्यांना केवळ २५ वर्षे काम करण्यासाठी मिळाले. त्यात काळात त्यांनी शिक्षण संस्थेंची स्थापना, सत्याग्रह, नियतकालिकांची निर्मिती, पक्ष काढणे तसेच विपूल लेखन आणि सर्वात महत्वाचे २३ ग्रंथांचे लिखान केले आहे. शिक्षणा शिवाय पर्याय नाही त्यांचा हा संदेशच मानव जातीच्या उध्दारासाठी अत्यंत महत्वाचा आहे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,” डॉ. आंबेडकर यांनी ३२ विषयांमध्ये पदव्या घेतल्या होत्या. ९ भाषा अवगत असणारे युगपुरूष डॉ. बाबासाहेब यांनी सतत कठोर परिश्रम, समर्पण, सतत शिकत राहणे या गुणांचा विसर होऊ दिला नाही.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,” शिक्षण हे शस्त्रा प्रमाणे आहे. त्याचा उपयोग कसा करावे हे ज्याने त्याने ठरवावे. प्रगती करावयाची असेल तर जुन्या गोष्टींचे विस्मरण हे उच्चत्तम बुद्धीमत्तेचे लक्षण आहे.”
डॉ. दत्ता दंडगे म्हणाले,” डॉ. आंबेडकर यांनी समतेसाठी चळवळ उभी केली होती. तसेच त्यांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला. १४ तळ्यांची चळचळ ही इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना आहे. समाजातील दांभिकतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले जीवन अर्पीत केले होते. यानंतर प्रा. गणेश पोकळे, डॉ. जोशी आणि प्रदिप चाफेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला तसेच कवितेचे वाचन केले.प्रा. विनोद जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
24.7 ° C
24.7 °
24.7 °
47 %
1.2kmh
0 %
Mon
32 °
Tue
33 °
Wed
33 °
Thu
33 °
Fri
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!