33.7 C
New Delhi
Wednesday, August 6, 2025
Homeमहाराष्ट्रवारीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सज्ज

वारीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सज्ज

पिंपरी : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेला आणि लाखो वारकऱ्यांची श्रद्धास्थान असलेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर या मार्गावर सुरु होणार आहे. “सुरक्षित वारी, अखंड सेवा!” या भावनेने पिंपरी चिंचवड महानगरपालिका व अग्निशमन विभाग पूर्णपणे सज्ज झाले आहेत.

महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख मनोज लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वारीदरम्यान अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग अहोरात्र सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर, वारी मार्गावर उच्चतम दक्षतेसह नियोजन करण्यात आले असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी आपत्कालीन परिस्थितीतत संपर्क करण्यासाठी ७७५७९६६०४ हा क्रमांक महापालिकेने जारी केला आहे.

वारीच्या काळात सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत. विजेच्या तारा, गॅस सिलिंडर किंवा आगीपासून दूर रहावे, आणि कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती दिसल्यास तत्काळ वरील क्रमांकांवर माहिती द्यावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सर्व वारकऱ्यांना व नागरिकांना करण्यात आले आहे.

सज्ज पथक आणि यंत्रणा

  • ७ सदस्यांची विशेष प्रशिक्षित टीम वारी दरम्यान नेमण्यात आली आहे. या टीममध्ये अनुभवी अग्निशमन अधिकारी, चालक व जवान यांचा समावेश आहे.
  • टीमसोबत फायर टेंडर (अग्निशमन गाडी), वॉटर टँकर, प्राथमिक उपचार किट, बचाव साहित्य (लाईफ रोप्स, स्ट्रेचर, कटर मशीन, पंप्स), तसेच जनरेटर आणि लाइटिंग सिस्टीम सुसज्ज स्वरूपात उपलब्ध आहे.
  • ही टीम पालीखीच्या मार्गावर दररोज मुक्कामी ठिकाणी २४x७ उपस्थित राहते.

नियंत्रण आणि समन्वय

  • अग्निशमन विभागाचा कंट्रोल रूम वारी दरम्यान घटनेच्या माहितीवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सज्ज करण्यात आलेला आहे.
  • वारी मार्गावरील स्थानिक पोलीस, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि स्वयंसेवी संस्था यांच्यासोबत निरंतर समन्वय साधला जाईल.

नागरिकांसाठी सूचना व मदत क्रमांक
वारीच्या मार्गावर कोणतीही अग्नितत्वाशी संबंधित आपत्ती, अपघात, शॉर्टसर्किट, अशा घटना घडल्यास ताबडतोब खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
पिंपरी चिंचवड अग्निशमन नियंत्रण कक्ष: ७७५७९६६०४

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
33.7 ° C
33.7 °
33.7 °
58 %
2.6kmh
100 %
Wed
34 °
Thu
38 °
Fri
39 °
Sat
31 °
Sun
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!