12.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्ररस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या ९६ झोपड्यांवर महापालिकेची निष्कासनाची कारवाई

रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या ९६ झोपड्यांवर महापालिकेची निष्कासनाची कारवाई

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील ४५ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या काळाखडक झोपडपट्टीतील सुमारे ४६ हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील ९६ झोपड्यांवर पिंपरी चिंचवड महापालिकेने निष्कासनाची कारवाई केली आहे.

वाकड येथील रस्ता रुंदीकरणातील अनधिकृत झोपड्या, टपऱ्या, दुकाने व वीट बांधकामे निष्कासित करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई हाती घेण्यात आली आहे. या कारवाईमध्ये आज काळाखडक झोपडपट्टीतील २५० मीटर लांबीच्या व १६ मीटर रुंदीच्या क्षेत्रावर असणाऱ्या ९६ झोपड्या निष्कासित करण्यात आल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, सह आयुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त तथा सक्षम प्राधिकारी अण्णा बोदडे, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त अमित पंडित, किशोर ननावरे, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सतीष कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र माळी, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, सुनिल पवार, अभिमान भोसले, सुनिल शिंदे, दिलीप लांडे उपस्थित होते.

‘ड’ व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग, स्थापत्य विभाग, शहरी दळणवळण विभाग (बी.आर.टी.एस.), नगररचना विभाग, विद्युत विभाग व अतिक्रमण विभाग यांनी १ पोकलेन्ड , ७ जेसीबी, ४ डंपर व १५ मजुर यांच्या सहाय्याने ही कारवाई केली आहे.
……..
रस्ता रुंदीकरणाच्या कामाला तात्काळ झाली सुरुवात

वाकड येथील अतिक्रमण निष्कासनाची कारवाई केल्यानंतर तातडीने पिंपरी चिंचवड महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. या रुंदीकरणाला अडथळा करणारे विद्युत खांब, जलवाहिन्या तसेच इतर सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन महापालिकेने केले असून हे काम देखील लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

……

रस्ता रुंदीकरणामुळे नागरिकांना होणारा फायदा!

वाकड येथील रस्त्याच्या रुंदीकरणामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. भूमकर चौक, हिंजवडकडे जाणाऱ्या तसेच हिंजवडीच्या दिशेने थेरगाव, पिंपरी या भागात येणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
……
कोट

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरामध्ये विकासाच्या दृष्टिने राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पाला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामाचे तात्काळ निष्कासन करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत.

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
    …….
    कोट

वाकड येथील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारे सर्व अनधिकृत बांधकामे काढण्यात येत आहे. याशिवाय शहरातील सर्वच क्षेत्रिय कार्यालयातील अनधिकृत बांधकामे निष्कासन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने बैठक देखील घेण्यात आली आहे.

  • प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
12.1 ° C
12.1 °
12.1 °
82 %
0kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
22 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!