भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी, संस्कृतीच्या जतनासाठी , राष्ट्रीय एकात्मता व शास्त्रीय प्रगतीसाठी, भारत सरकारने घोषित केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) द्वारे सर्वाना दर्जेदार शिक्षण उपलब्ध होईल व याचा फायदा पुढच्या दशकात युवकांना होईल ,असे उद्गार खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात काढले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे शिक्षक आघाडी ने आयोजित ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण – एक चर्चासत्र’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.या कार्यक्रमात , MIT कॉलेज चे रजिस्ट्रार डॉ रत्नदीप जोशी , रायसोनी कॉलेजचे डॉ हरीश कुलकर्णी यांनी भारतीय ज्ञान प्रणाली व राष्ट्रीय शिक्षण धोरण याविषयावर उत्तम माहिती उपस्थित शिक्षकांना दिली.

पुण्यात लवकरच ब्राह्मण भवन उभारण्यात येईल व त्यात नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विशेष दालन उपलब्ध असेल असे उद्गार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गोविंद कुलकर्णी यांनी काढले.पुणे जिल्हा अध्यक्ष , मंदार रेडे यांनी , पुणे जिल्ह्यातील शिक्षकांसाठी कौशल्य विकास , नवीन तंत्रज्ञान याच्या कार्यशाळा घेण्यात येतील असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र जोशी , सूत्रसंचालन भाग्यश्री सुपनेकर व आभार शुभांगी दाऊतखाने यांनी केले.यानिमित्त सुमारे ५० पेक्षा जास्त शिक्षकांना नियुक्ती पत्रके देण्यात आली. संपुर्ण पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.


