40.8 C
New Delhi
Saturday, June 7, 2025
Homeमहाराष्ट्रऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर चिंचवडमध्ये तिरंगा रॅली; भारतीय सैन्याला नागरिकांचा सलाम

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर चिंचवडमध्ये तिरंगा रॅली; भारतीय सैन्याला नागरिकांचा सलाम

पिंपरी-चिंचवड : पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय सैन्याने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. भारतीय सैन्याच्या या शौर्याला आणि बलिदानाला सलाम करण्यासाठी चिंचवडगाव परिसरातील नागरिकांनी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले.

‘राष्ट्रप्रेमी चिंचवडकर’ नागरिकांच्या वतीने क्रांतिवीर चापेकर बंधू चौक ते महासाधू मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर या मार्गावर ही तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीला चिंचवडकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हातात तिरंगा, देशभक्तीचे गाणे आणि देशासाठी अभिमानाची भावना घेऊन नागरिकांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला.

रॅलीत चिंचवडगावातील स्थानिक माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, तसेच सामाजिक कार्यकर्ते हर्षद नढे, अजित कुलथे, कैलास सानप, प्रदीप सायकर, शिवम डांगे, नूतन चव्हाण, सुरेखा जाधव, महेश मिरजकर, आदित्य रेवतकर, अतुल कांबळे आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून देशातील माता-भगिनींच्या सिंदूरावर हात घालणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई केली. या यशस्वी कारवाईनंतर देशभरात भारतीय सैन्याचे कौतुक होत आहे. चिंचवडकर नागरिकांनीही आपल्या देशाच्या सैन्याला सलाम करून राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
40.8 ° C
40.8 °
40.8 °
21 %
1.1kmh
0 %
Sat
40 °
Sun
46 °
Mon
46 °
Tue
45 °
Wed
45 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!