मंचर :धामणी (तालुका आंबेगांव) -येथील खंडोबा देवस्थान मंदिराच्या प्रांगणात पारंपारिक वाद्याच्या गजरात व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत शाही थाटात शनिवारी पौष पौर्णिमेनिमित्त”सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात खंडोबा म्हाळसाईचा विवाह सोहळा संपन्न झाला. शनिवारी पहाटे माघस्नान समारंभ.कुलधर्म.अन्वाधान.पौष पौर्णिमेला खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अभिषेक अक्षय कौटकर व सौ वृषाली कौटकर (लोणी)संतोष वाळूंज व सौ नंदाबाई वाळूंज(वाळूंजनगर लोणी)भिमराव गायकवाड व सौ संगिता गायकवाड (लोणी)प्रसाद विधाटे व सौ.सानिका विधाटे(धामणी)ओंकार भुमकर व सौ साक्षी भुमकर (धामणी)मच्छिंद्र करंजखेले व सौ अर्चना करंजखेले(धामणी)सोमनाथ राजगुरु व सौ आशा राजगुरु (अवसरी खुर्द)देविदास करंजखेले व सौ विशाखा करंजखेले(धामणी)उदय डोके व सौ जयश्री डोके(माजी सभापती आंबेगांव.खडकवाडी)शिवाजी करंजखेले व सौ मिना करंजखेले (धामणी)समीर करंजखेले व सौ.निता करंजखेले (धामणी)या अकरा जोडप्यांच्या हस्ते रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला.

नंतर भाविकांच्या उपस्थितीत आरती केली.त्यानंतर सेवेकरी दादाभाऊ भगत.प्रभाकर भगत.सुभाष तांबे.शांताराम भगत.राजेश भगत.नामदेव भगत.पांडुरंग भगत.प्रमोद देखणे.धोंडीबा भगत.अनिरुध्द वाळूंज.बाळशिराम साळगट दिनेश जाधव.सुरेश पवार.माऊली वाघे.सिताराम वाघे.यांनी व महिला भाविकांनी स्वयंभू सप्तशिवलिंगाला व सर्वांगसुंदर खंडोबा व म्हाळसाईच्या पंंचधातूच्या लोभसवाण्या मुखवट्यांना चंदनऊटीचा लेप दिला.व त्यावर सुंगधी दवणाच्या अत्तरात मिश्रित केलेली पिवळीधम्मक हळद लावण्यात आली.सकाळी नऊ वाजता बाळासाहेब महादू बढेकर.विठ्ठल बढेकर व अंकुश बढेकर.अक्षय तोत्रे (चांडोली) संतोष भुमकर यांच्या मानाच्या मांडव डहाळ्याची पारंपारिक वाद्याच्या व डीजेच्या गजरात धामणीच्या पेठेतून मिरवणूक काढण्यात येऊन सजवलेल्या बैलगाड्यातील मांडव डहाळे मंदिरात सदानंदाचा येळकोट करुन व भंडार्याची उधळण करुन देवाला अर्पण करण्यात आले.श्री म्हाळसाकांत खंडोबा व म्हाळसादेवी यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त मंदिराच्या गाभार्यात आकर्षक फुलांची सजावट केलेली होती.खंडोबाला व म्हाळसाईच्या देखण्या मूर्तीना बाशिंग व मुंडावळ्या बांधण्यात आल्या.गावातील मुक्ताबाई मंदिरात पौष महिण्याच्या खंडोबाच्या पालखीचे परंपरागत मानकरी समस्त करंजखेले मळ्यातील मंडळीच्या हस्ते तळीभंडार व आरती करण्यात आली.त्यानंतर आकर्षक वस्रालंकाराने सजवलेल्या व बाशिंग व मुंडावळ्या बांधलेल्या खंडोबाचा मुखवटा पालखीत ठेवून पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.पालखीसमोर पिंपळवंडी(जुन्नर) येथील आकर्षक अश्व(घोडा) सर्वाचे लक्ष वेधून घेताना दिसला.पालखीची मिरवणूक सायंकाळी पावणेपांच वाजता मंदिरात विसावली.मंदिराच्या आवारात नवरदेव म्हाळसाकांत खंडोबाच्या मुखवट्याचे महिलांनी औक्षण करुन स्वागत केले.त्यानंतर सनई व तुतारीच्या निनादात बाशिंग व मुंडावळ्या घातलेल्या व हिरवी साडी परिधान केलेल्या व वस्रालंकार घातलेला म्हाळसाईचा मुखवटा मंदिरातून सेवेकरी मंडळीनी लग्नमंडपात वाजतगाजत आणला.सायंकाळी पांंच वाजता मंगलाष्टकाला सुरुवात करण्यात येऊन खंडोबा व म्हाळसाईच्या मुखवट्यावर फुलांच्या पाकळ्याची व अक्षता व भंडार्याची उधळुन वाद्याच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीत सदानंदाचा येळकोट चा जयघोष करुन खंडोबा व म्हाळसाईचा विवाह सोहळा पार पडला.त्यानंतर उपस्थित वर्हाडी मंडळीनी बुंदी.भात आमटीचा महाप्रसादाचा आस्वाद घेतला.शाही विवाह सोहळ्याचे पौरोहित्य प्रमोद देखणे.बाळासाहेब बेरी व मुकुंद क्षिरसागर यांनी केले यावेळी देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश पाटील जाधव.माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले.प्रभारी सरपंच अक्षय विधाटे. सेवेकरी दादाभाऊ भगत.प्रभाकर भगत.सुभाष तांबे.नामदेव भगत.माजी सरपंच सागर जाधव.पहाडदर्याचे सरपंच मच्छिंद्र वाघ.शामराव करंजखेले.माजी सरपंच सौ रेश्मा बोर्हाडे. उपसरपंच संतोष करंजखेले.भाऊसाहेब करंडे.अशोक करंजखेले.अरुण करंजखेले.भाऊसाहेब कदम.उत्तम जाधव.निलेश करंजखेले.दगडूभाऊ करंजखेले.भगवान वाघ.भगवान बढेकर.वसंत जाधव.अंकुश भुमकर.लोणीचे माजी सरपंच दिलीप वाळुंज.अशोकराव कांदळकर(कवठे यमाई) यांच्यासह सेवेकरी.मानकरी मंडळी व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.


