26.2 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeमहाराष्ट्रपहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा पुण्यात भव्य शुभारंभ

पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा पुण्यात भव्य शुभारंभ

पुणे, – पशुवैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत, देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय (AnimalWelfare) दवाखान्याचा शुभारंभ आज हडपसर येथे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या अनोख्या उपक्रमामुळे आता पशुप्रेमी आणि शेतकऱ्यांना अत्याधुनिक पशुवैद्यकीय सेवा थेट आपल्या दारात मिळणार आहे.

या वेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे, युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. हनुमंत शेळके, सचिव डॉ. स्वाती शेळके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

२०३० पर्यंत रेबीज निर्मूलनाचे ध्येय

डॉ. हनुमंत शेळके आणि डॉ. स्वाती जोगदंड शेळके या दाम्पत्याने २००९ साली बीड जिल्ह्यातून युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीची स्थापना केली. “२०३० पर्यंत रेबीज निर्मूलन” हे ध्येय समोर ठेवून, ग्रामीण भागातील वाढती श्वानसंख्या, श्वानदंशामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका आणि पशुवैद्यकीय सुविधांचा अभाव या सर्व समस्यांवर उपाय म्हणून हा फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील विविध भागात मोफत पशुवैद्यकीय सेवा पोहोचवली जाणार आहे.

अत्याधुनिक सुविधा आणि मोठी क्षमता

या फिरत्या रुग्णालयाचे क्षेत्रफळ सुमारे २ हजार चौरस मीटर असून, पहिल्या मजल्यावर १० कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था आहे. महिन्याला ५०० शस्त्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या दवाखान्यात एकावेळी १०० कुत्र्यांना ठेवता येईल. ऑपरेशन थिएटर, ओपीडी, कन्व्हर्टेबल (VeterinaryCare)कॉन्फरन्स रूम, किचन, अभिलेख कक्ष, चर्चासत्र कक्ष, वातानुकूलित आणि अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती, लसीकरण, आपत्कालीन उपचार, नसबंदी अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

ग्रामीण भागासाठी वरदान

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवा अधिक सुलभ, वेगवान आणि व्यापक होणार आहेत. श्वानदंश आणि रेबीज निर्मूलनासाठी हे फिरते रुग्णालय एक प्रभावी उपाय ठरणार आहे. पशुप्रेमी, शेतकरी आणि नागरिकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे.

या अभिनव उपक्रमामुळे महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय सेवेला नवी दिशा मिळणार असून, प्राणी आणि मानव आरोग्याच्या दृष्टीने हा एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
26.2 ° C
26.2 °
26.2 °
46 %
2.6kmh
0 %
Thu
26 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!