कोकणवासीय मराठा समाज श्रीराम मंदिर समितीच्या वतीने दिघी येथील श्रीराम मंदिर मध्ये रामनवमी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विधिवत पूजा आणि होमहवन करून सुरवात करण्यात आली. होमहवन व पूजा साठी समाजातील नवविवाहित दाम्पत्य आणि वरीष्ठ सभासद सपत्नीक बसले होते.त्यानंतर समाजातील लोकांच्या वैद्यकीय चाचण्या करून घेण्यासाठी वैद्यकीय शिबीर श्री निलेश चव्हाण व श्री संदीप चव्हाण यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले होते. बहुसंख्य लोकानी त्याचा लाभ घेतला. वैद्यकीय चाचणी ची सुरवात सन्मानीय आमदार श्री महेश दादा लांडगे यांचे बंधू श्री सचिन भाऊ लांडगे व त्यांचे सहकारी यांच्या पासून सुरुवात करण्यात आली.त्या नंतर दुपारी ठीक 12.00 वा. रामजन्म सोहळा अगदी मंगलमय वातावरणात पार पडला व त्यानंतर आलेल्या भावीकानी आणि समाज बांधव यांनी महाप्रसाद घेतला.कार्यक्रमाला सकाळ पासूनच भजन चालू होते. तरी सदर उत्सव अगदी रात्री 10.00 वाजेपर्यंत चालू होता आणि येणार्या भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम मंदिर समिती आणि कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिपरी चिंचवड चे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा सोहोळ्यास आवर्जून उपस्थित होते आणि सर्वानी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. विशेषत मंदिर समिती अध्यक्ष श्री अनिल आप्पाजी मोरे, मंदिर समिती खजिनदार श्री नंदू चव्हाण, को. म. समाजाचे उपाध्यक्ष श्री दत्ता जाधव व इतर पदाधिकारी श्री संतोष भोसले, श्री अनिल शिंदे, श्री राजेश शिंदे, श्री गणेश मोरे श्री विनोद चव्हाण, श्री संजय सकपाळ, श्री संदिप सावंत श्री राजेंद्र सोंडकर, श्री अनंत सकपाळ, श्री समीर हळदे, श्री राजेंद्र दळवी आणि समाजातील बहुसंख्य महिला यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिपरी चिंचवड अध्यक्ष श्री संतोष कृष्णा मोरे साहेब यांनी सर्व पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, संपर्कप्रमुख आणि सभासद व सर्व कार्यकारिणी यांनी कार्यक्रम उत्कृष्ट पणे पार पाडला त्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आली.
श्री रामनवमी उत्सव जल्लोषात साजरा
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
28
°
C
28
°
28
°
82 %
3.7kmh
100 %
Mon
28
°
Tue
35
°
Wed
35
°
Thu
36
°
Fri
34
°