पुणे : कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिंपरी चिंचवडचा वर्धापन दिन जल्लोषात व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा सोहळा रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी उद्यान मंगल कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात कोकणातील पारंपरिक ‘जागडी नृत्यकला’ सादरीकरणाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे डॉ. कैलास कदम (कामगार नेते), संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष कृष्णा मोरे, तसेच संस्थापक श्री. वसंतराव मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सचिव श्री. रमेश मोरे यांनी गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
सन्मानप्राप्त मान्यवर खालीलप्रमाणे —
सामाजिक क्षेत्र: श्री. कृष्णा कदम, श्री. सूर्यकांत मोरे, श्री. वसंत चव्हाण, श्री. अप्पाजी मोरे, श्री. रविंद्र मोरे
सैनिकी क्षेत्र: कॅ. रमेश सकपाळ
शैक्षणिक क्षेत्र: सौ. मनीषा राजेंद्र चव्हाण
कला क्षेत्र: श्री. मोहन जाधव
औद्योगिक क्षेत्र: श्री. मोहन मोरे, श्री. गोपाळ मोरे
क्रीडा क्षेत्र: प्रसाद शिंदे
वैद्यकीय क्षेत्र: श्री. दीपक मोरे
कृषी क्षेत्र: श्री. दीपक शिंदे
पोलीस दल: श्री. भरत मोरे
त्यानंतर समाजातील उच्चशिक्षित विद्यार्थी आणि १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे डॉ. कैलास कदम यांनी समाजाला मार्गदर्शन करताना सांगितले की, “समाज एकसंघ राहिला पाहिजे. समाजातील मुले-मुली IAS, IRS सारख्या उच्च पदांवर पोहोचली पाहिजेत, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. समाजाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे.यानंतर विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, जेष्ठ मार्गदर्शक यांचा सत्कारही करण्यात आला. वेळेअभावी सर्व मान्यवरांना मनोगत व्यक्त करता आले नाही, याबद्दल आयोजकांनी दिलगिरी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष कृष्णा मोरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीतानंतर सर्व समाजबांधवांनी स्वादिष्ट सुरूची-भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष श्री. दत्ता जाधव, श्री. अनिल मोरे, कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र सोंडकर, सहसचिव श्री. संजय सकपाळ, खजिनदार श्री. सचिन मोरे, तसेच श्री. दत्ता मोरे (गुरुजी), संपर्कप्रमुख श्री. विनोद चव्हाण, श्री. संदिप सावंत, श्री. कृष्णा जाधव, श्री. मंगेश शिंदे, श्री. राजेश शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे मार्गदर्शन समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. प्रकाश मोरे, श्री. रामचंद्र मोरे, श्री. रघुनाथ शिंदे, श्री. सुहास मोरे, श्री. भरत मोरे, श्री. अनिल सकपाळ यांनी केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दैनिक गुहागरचे वार्ताहर श्री. सुदर्शन जाधव यांनी प्रभावीपणे केले.