मुंबई- १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त २६५०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जुनी पेन्शन योजने संदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे भेट घेतली व राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेनुसार सुधारित शेवटच्या वेतनाच्या ५०% निवृत्ती वेतन सुरू करण्याचे आपण २० सप्टेंबर २०२४ रोजी शासन आदेश काढून या कर्मचा-यांना न्याय देऊन राज्यातील १८ लाख कर्मचारी यांच्या पेन्शनचा आपण प्रश्न मार्गी लावला आहे परंतु यातून शालेय शिक्षण विभागातील २६५०० शिक्षक अजूनही वंचित आहेत याची जाणीव करून देत,शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीचा कालावधी पाच वर्षा पेक्षा जास्त होऊनही कार्यवाही झाली नसल्याची माहिती दिली असता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे शिक्षण मंत्री यांना या २६५०० कर्मचारी यांच्या पेन्शन बाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.या बाबत आमचा राज्याचे मुख्यमंत्री, वित्त मंत्री यांच्याकडे ही या बाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मा.आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली.आज झालेल्या भेटीच्या शिष्ठमंडळात अमरावती विभागाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे ,मारुती गायकवाड, आदी उपस्थित होते.
हक्काच्या पेन्शनसाठी लढा तेज; माजी आमदार सावंतांची उपमुख्यमंत्र्यांकडे धडक
२६,५०० शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष!"
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
26.2
°
C
26.2
°
26.2
°
46 %
2.6kmh
0 %
Thu
26
°
Fri
31
°
Sat
32
°
Sun
33
°
Mon
33
°