पंढरपूर – :- कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 5 कोटी 18 लाख रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी दिली.
कार्तिकी शुध्द 01 (दिनांक 22 ऑक्टोंबर) ते कार्तिकी शुध्द 15 (दिनांक 05 नोव्हेंबर) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ 4808289 रुपये अर्पण, 12719520 रुपये देणगी, 5416500 रुपये लाडू प्रसाद विक्री, 7159910 रुपये भक्तनिवास, 17715227 रुपये हुंडीपेटी, 50000 रूपये पुजा तसेच 3336876 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 670906 रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ 4141314 रुपये अर्पण, 11699473 रुपये देणगी, 6064620 रुपये लाडू प्रसाद विक्री, 4448581 रुपये भक्तनिवास, 7356104 रुपये हुंडीपेटी, 1072681 रूपये पुजा तसेच 504015 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 460534 रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.
सन 2024 च्या कार्तिकी यात्रेत रू. 35747322/- व या वर्षीच्या यात्रेत रू. 51877228/- इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत रू. 16129906/- इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी सांगीतले.


