पुणे: पुणा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अॅन्ड आंत्रप्रेन्युअरशिप (PIMSE) मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. “एक पृथ्वी, एक योग – आरोग्यासाठी” या जागतिक घोषवाक्याच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संस्थेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या विशेष दिनानिमित्त प्रसिद्ध योग प्रशिक्षक श्री. सचिन ससाणकर यांनी ऑनलाईन सत्राच्या माध्यमातून उपस्थितांना योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे सखोल मार्गदर्शन केले. सत्राच्या दरम्यान शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक शांततेवरही भर देण्यात आला. उपस्थितांनी ध्यानधारणा व श्वसन तंत्रामधून अंतर्मुख होण्याचा अनुभव घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पायल समदरिया आणि श्री. मुबारक तांबोळी यांनी केले होते. या संपूर्ण उपक्रमामागे संस्थेच्या संचालक डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांचे सक्रिय मार्गदर्शन लाभले.
योग दिनाच्या निमित्ताने संपूर्ण संकुलात आरोग्याचे महत्व अधोरेखित करणारा सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण तयार झाले होते.
योगसाधनेच्या माध्यमातून “तणावमुक्त जीवनाची वाटचाल” ही भावना सर्व सहभागींच्या मनात रुजली. संस्थेच्या वतीने पुढील काळातही अशा आरोग्यवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
