13.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानअबॅकसमुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ

अबॅकसमुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ

पुणे : गणितीय कौशल्य आत्मसात् करीत आपली अंगभूत क्षमता विकसीत करण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच आजचे विद्यार्थी अबॅकसच्या माध्यमातून गणितामध्ये प्राविण्य मिळवितांना दिसतात एवरेस्ट अबॅकस अकॅडमी वडगांवशेरी पुणे या शाखेमध्ये या शालेय विद्‌यार्थ्यांना यासंदर्भात घेण्यात आलेल्या ३१ व्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत येथील एकूण 20 वि‌द्यार्थ्यांनी नेपूण्य संपादन करत एक प्रकारे यशाचे एवरेस्ट गाठले यशस्वी विद्यार्थ्यांना अबॅकस शिक्षिका सौ दुर्गा राहुल पवार यांनी मार्गदर्शन केले.एवरेस्ट अबैकस अकॅडमी कडून ३१ व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्शचे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने स्पर्धेचे नियोजन 15 सप्टेंबर २०२४ रोजी वेगवेगळ्या केंद्रावर करण्यात आले. यावेळी वडगांवशेरी पुणे शाखेतील विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले. विध्यार्थ्यांच्या पारितोषिक सभारंभासाठी प्रमुख पाहुणे पोलीस इन्स्पेक्टर मुंबई ब्रँच येथील आदरणीय श्री. संदीप जमदाडे साहेब उपस्थित होते.त्यांच्या हस्ते सर्व विध्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
वडगांवशेरी पुणे शाखेमधील चार विध्यार्थ्यानी पाच मिनिटात जास्तीत जास्त गणिते सोडवले व चॅम्पियन चे बक्षीस पटकवले त्यामध्ये मल्हारराजे तरडे याने १४२ गणिते सोडवले ( बेरीज + वजाबाकी ) अथर्व राहुल पवार याने पाच मिनिटात १३० गणिते सोडवले, वेदिका गवळी हिने १३६ गणिते सोडवले तसेच रवी यमजाल याने ११६ गणिते सोडवले आणि हे वरील सर्व विध्यार्थी चॅम्पियन पुरस्काराचे मानकरी ठरले.
तसेच नियती पेठे, प्रियांश लड्डा, सिद्धांत सोनावणे, आयुष विक्रम जावळे, जिगीषा पुंडे, आद्यश्री अमोल अकोलकर, सावि साळवी, दुर्वेश दत्तात्रय पाटील, मृणाल चव्हाण, अर्णव कुदळे, श्लोक राजगुरू, यांनी १०० पेक्षा जास्त गुण मिळूवून पहिल्या दहा मध्ये राष्ट्रीय स्तरावर बक्षीसाचे मानकरी ठरले, तर शार्दूल चव्हाण,नेथन गायकवाड, बेस्ट रँक मिळवली तसेच अनन्या बारकूल, अभिदज्ञा गाडे, यांनी देखील एक्ससिलंट रँक मिळवली.
अबॅकस मुळे विध्यार्थ्याच्या गणिताची गती वाढती तसेच एकग्रता, स्मरणशक्ती,आणि आत्मविश्वास वाढतो असे वडगांवशेरी पुणे येथील संचालिका सौ. दुर्गा राहुल पवार मॅडम यांनी सांगितले.तसेच एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या सर्वेसर्वा अध्यक्ष सौं. कल्पना घडेकर मॅडम ने देखील विदयार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन केलेल्या शिक्षिका यांचे कौतुक केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
76 %
0kmh
0 %
Wed
19 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!