पुणे, : स्वित्झर्लंड-स्थित असलेल्या ३ ए कंपोझिट्स या जागतिक स्तरावर नव कल्पनाधारित व उच्च दर्जाचे अल्युमिनियम कंपोझिट्स मटेरियल निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपनीने आपल्या ‘अलुकोबॉन्ड’ या नाममुद्रे अंतर्गत आपल्या तीन दशकांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या पुढील पिढीतील ‘अलुकोअर’ या कॉम्पोझिट मटेरियल्सचा भारतातील आर्किटेक्ट्ससाठी व आर्किटेक्चरच्या क्षेत्रात परिवर्तन आणण्याच्या दृष्टीने विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या नव-संशोधनाच्या समृद्ध वारशावर आधारित ‘अलुकोअर’ हे उत्पादन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक प्रगत व सक्षम केले गेले असून आता ते ‘अलुकोअर हनीकोम्ब पॅनेल्स’ आणि ‘अलुकोअर एसीसीपी या दोन श्रेणींत अभिनव स्वरूपात उपलब्ध आहे.
‘अलुकोअर हनीकोम्ब’मध्ये दोन अॅल्युमिनियम शीट्सच्यामध्ये अॅल्युमिनियम हनीकोम्ब कोअर असतो, ज्यामुळे ते अत्यंत मजबूत आणि हलके बनते. तर ‘अलुकोअर एसीसीपी.’ मध्ये दोन अॅल्युमिनियम स्किन्सच्या मध्ये अॅल्युमिनियम कॉरुगेटेड कोअर असतो, जो त्याला अधिक कठोरता आणि लवचिकता प्रदान करतो. हे दोन्ही प्रकार भारतीय आर्किटेक्ट्सच्या बदलत्या गरजांनुसार विकसित करण्यात आले आहेत, ज्यामुळे ते उच्च व उत्कृष्ट डिझाईन, सौंदर्य आणि टिकाऊपणा यांचे परिपूर्ण संयोजन साधू शकतात.
हा विस्तार कंपनीच्या विद्यमान तंत्रज्ञानाधारित, नेक्स्ट -जेन क्लॅडिंग सोल्युशन्सच्या प्रमुख पोर्टफोलिओला अधिक बळकटी देईल, जिथे डिझाईन आणि कार्यक्षमतेची भूमिका महत्त्वाची असते. अलुकोअरचा वापर विशाखापट्टणम तसेच पटना विमानतळ, लखनौ येथील लुलु मॉल, नोएडा येथील मॅक्स टॉवर् इत्यादी भारतातील अनेक महत्त्वाच्या प्रतिष्ठीत पायाभूत व खाजगी प्रकल्पांमध्ये झाला आहे. अलुकोअरची उत्कृष्ट यांत्रिक वैशिष्ट्ये या उत्पादनाला फसाड क्लॅडिंग, रूफिंग आणि देखभालयोग्य अशा वॉकेबल रूफ्ससाठी सुयोग्य बनवतात.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत, ३ ए कॉम्पोझिट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्रातील पुण्याजवळील रांजणगाव येथील अत्याधुनिक कारखान्यात अलुकोअरचे उत्पादन करीत आहे. सध्या अलुकोअरचे भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जात असून जागतिक स्तरावर याची निर्यातही केली जाते.
या उत्पादनाच्या विविध उपयोगांबद्दल बोलताना ३ ए कॉम्पोझिट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व सीईओ श्री. रणजित शर्मा म्हणाले, “आर्किटेक्चरच्या वेगाने बदलणाऱ्या क्षेत्रात आम्ही इनोव्हेटिव्ह कॉम्पोझिट मटेरियल्स सादर करत आहोत ज्यामुळे संपूर्ण उद्योगाची परिभाषा बदलत आहे. अलुकोअरच्या माध्यमातून आम्ही आर्किटेक्ट्सना असे प्रकल्प डिझाईन करण्याची क्षमता देत आहोत जे कार्यक्षमता, टिकाऊपणा व अग्नीसुरक्षेमध्ये सर्वोत्तम आहेत. आम्हाला खात्री आहे की, अलुकोअर हे भारतीय बाजारात गेम-चेंजर ठरेल आणि आर्किटेक्चरच्या उत्कृष्टतेसाठी नवे मानक प्रस्थापित करेल.”
अलुकोअरचा पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यामागील कारण स्पष्ट करताना, ३ ए कॉम्पोझिट्सचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट श्री. अमर किराळे म्हणाले, “अलुकोअर हे पूर्णत: पुनर्वापरयोग्य मटेरियल असून त्यामुळे शाश्वत व अत्याधुनिक इमारतींच्या रचनेसाठी एक परिपूर्ण फसाड मटेरियल ठरते. आम्ही संपूर्ण भारतभरातील आर्किटेक्ट्ससोबत अनुभवाधारित संवाद कार्यक्रमांतून व ओरीएंटेशन्सच्या माध्यमातून अलुकोअरचा विस्तार करत आहोत. यासाठी आम्ही एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे ज्यामध्ये मुक्त संवाद, थेट सत्रे व सादरीकरणांचा समावेश आहे, ज्याद्वारे या उत्पादनाची क्षमता प्रदर्शित केली जाईल.”
अलुकोअरचे उत्पादन स्वयंचलित व इंटेलिजन्ट लाईनवर केले जाते, ज्यामुळे परिपूर्ण समतलता, सुयोग्य फिनिश व एकसमान गुणवत्ता प्रदान करते. अलुकोबॉन्ड या प्रमुख उत्पादनात असलेले सर्व सरफेस फिनिशेस् अलुकोअर मध्येही शक्य आहेत व यात सॉलिड्स, मेटॅलिक्स, वायब्रंट्स, वुड-फिनिश, स्टोन-फिनिश, मार्बल-लुक, अॅनोडाइज्ड-लुक इत्यादी सरफेस फिनिशेस् उपलब्ध आहेत. याशिवाय, कंपनी ‘कलर कस्टमायझेशन सर्व्हिस देखील उपलब्ध करून देते, ज्याद्वारे कोणत्याही विशिष्ट रंगछटेची जुळणी करणे शक्य होते.
अलुकोअर हे नॉन-कॉरोसिव्ह मरीन-ग्रेड अॅलॉयपासून बनविल्यामुळे ते अगदी कठीण हवामानातही दीर्घकालीन टिकाऊपणा, उत्कृष्ट हवामान प्रतिरोधकता देते व विश्वसनीय कार्य करू शकते. तसेच, अलुकोअर कठोर असे अग्नीसुरक्षा मानकांचे निकष पूर्ण करते, ज्यामुळे ते उंच इमारती, महत्वपूर्ण पायआभूत प्रकल्प आणि मोठ्या लोकसंख्येच्या ठिकाणांसाठी आदर्श ठरते, जिथे अग्नीसुरक्षा अत्यावश्यक आहे.


