पुणे, : आर्थिकदृष्ट्या सुरक्षित निवृत्त जीवन हे आयुष्यभर टिकणाऱ्या स्थिर उत्पन्नाच्या पायावर मजबूत उभे असते. त्यामुळे, निवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य राखण्यासाठी अॅन्युइटी हा पाया ठरला आहे. वाढते आयुर्मान, वाढती महागाई आणि बाजारातील अस्थैर्य अशा घटकांमुळे अंदाजित उत्पन्नाची गरज पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची बनली आहे. आजचे निवृत्ती नियोजन फक्त बचतीपुरते मर्यादित नाही. त्यासाठी एक विश्वासार्ह उत्पन्न प्रवाह तयार करणे आवश्यक आहे जो निवृत्तीनंतरच्या दीर्घ वर्षांमध्ये एक चांगले राहणीमान देऊ शकेल.
अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्सने कंटारच्या भागीदारीत केलेल्या इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडी ५.० (आयआरआयएस ५.०) मध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे की पुढील ५-१० वर्षांत सुमारे १२० दशलक्ष भारतीय लोक निवृत्त होतील. यातून स्थिर, खात्रीशीर उत्पन्न उपायांसाठी वाढत्या मागणीच्या आगामी ट्रेंडचे संकेत मिळतात.
अनुराग गुप्ता, ईव्हीपी आणि मुख्य व्यवसाय अधिकारी भागीदारी चॅनल, ॲक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स म्हणाले की, आयआरआयएस ५.० च्या अभ्यासानुसार देशाच्या निवृत्ती तयारी निर्देशांकात लक्षणीय वाढ झाली आहे. ती २०२५ मध्ये ४८ पर्यंत वाढली आहे. ती मागच्या तीन वर्षांत ४४ होती. तथापि, यातून निवृत्तीसाठीच्या तयारीतील मोठ्या तफावतीचे संकेतदेखील दिसतात. सुमारे ७० टक्के शहरी भारतीयांना निवृत्तीबद्दल आत्मविश्वास वाटतो, परंतु त्याहूनही कमी लोकांना आयुष्यभराचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच त्यापैकी ७७ टक्के लोकांचा असा विश्वास आहे की शांततापूर्ण निवृत्तीसाठी १ कोटी किंवा त्यापेक्षा कमी रक्कम पुरेशी आहे. त्यात पुढील दशकात वाढणाऱ्या महागाईचा पुरेसा विचार केलेले दिसत नाही.
पारंपरिकपणे अॅन्युइटीजकडे फक्त निश्चित परतावा देणारे साधन म्हणून पाहिले जात असे. आज, ते आश्वासन, विश्वासार्हता आणि दीर्घायुष्य व बाजाराशी संबंधित जोखीम या दोन्हींपासून संरक्षण दर्शविणारे म्हणून विकसित झाले आहेत. अॅन्युइटीज ही विस्तृत तफावत भरून काढण्यासाठी एक आदर्श साधन आहे, कारण ते संपत्तीचे सुसंगत, अंदाजित उत्पन्नात रूपांतर करण्यास मदत करते. त्यामुळे लोकांना लवचिकतेसह स्थैर्य मिळवणे शक्य होते.
अभिमानाने जगणे
निवृत्तीनंतर मर्यादित निवृत्तीवेतन असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अॅन्युइटीजमध्ये गुंतवणूक केल्याने नियमित उत्पन्न निर्माण होण्यास मदत होते. भारतात निवृत्त जीवनासाठी आर्थिक नियोजनाचा विचार केला तर जागरूकता वेगाने वाढत आहे. आयरिस ५.० अभ्यासानुसार, ४३ टक्के प्रतिसादकांना वाटते की नियोजन वयाच्या ३५ वर्षांपूर्वी सुरू झाले पाहिजे. त्यातील फक्त ३७ टक्के लोकांनी त्यांच्या लक्ष्य निधीच्या एक चतुर्थांश भागदेखील साध्य केला आहे. त्याचवेळी, आर्थिक सक्षमता कमी आहे. सुमारे ६३ टक्के प्रतिसादकांना वाटते की त्यांची बचत निवृत्तीनंतर १० वर्षांपेक्षा कमी काळ टिकेल. ही भावना तेव्हाच बदलेल जेव्हा लोकांना हे समजेल की सन्माननीय निवृत्त जीवन जगण्यासाठी नियोजन लवकर सुरू करावे लागेल. लक्षात ठेवा, एक मजबूत निवृत्ती योजना आर्थिक संरक्षण देणाऱ्या परताव्यासाठी नसते तर ती दीर्घकालीन विश्वासार्हतेसह उत्पन्न देते.


