28.1 C
New Delhi
Saturday, April 11, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानआदित्य बिर्ला ज्‍वेलरीचा ब्रँड इंद्रियाने फिनिक्स मार्केटसिटीमध्ये नवीन स्टोअर केले लाँच

आदित्य बिर्ला ज्‍वेलरीचा ब्रँड इंद्रियाने फिनिक्स मार्केटसिटीमध्ये नवीन स्टोअर केले लाँच

पुणे, – इंद्रिया या आदित्‍य बिर्ला ज्‍वेलरीच्‍या बँडने पुण्‍यामध्‍ये आपले नवीन स्‍टोअर लाँच केले आहे, जे शहरातील ४थे स्‍टोअर आहे. यासह ब्रँडने महाराष्ट्रातील आपली उपस्थिती अधिक दृढ केली आहे. हा विस्तार वाढीची मोठी क्षमता असलेल्या प्रमुख महानगरांमध्ये आपली उपस्थिती अधिक दृढ करण्याच्या ब्रँडच्या धोरणाशी सुसंगत आहे.

पूर्व पुण्यातील सर्वात महत्त्वाचे रिटेल आणि लाइफस्टाइल केंद्र असलेल्या विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटीमध्ये स्थित हे नवीन इंद्रिया स्टोअर ब्रँडला सुजाण आणि शहरी ग्राहकांच्या अधिक जवळ घेऊन जाते. प्रगत आणि मंत्रमुग्ध करणारा खरेदीचा अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेल्‍या या स्‍टोअरमधून इंद्रियाचे विचारपूर्वक केलेले डिझाइन, वैयक्तिक सेवा आणि आधुनिक लक्झरीवर असलेले लक्ष दिसून येते. या स्‍टोअरमध्‍ये ३२,००० हून अधिक डिझाइन्स उपलब्ध आहेत, त्यामध्ये वधू-अलंकार, सण-उत्सवांसाठीचे दागिने, समकालीन आणि दैनंदिन वापरासाठीचे हलक्या वजनाचे दागिने यांचा समावेश आहे. स्टोअरमध्ये विशेष कारीगरी रूम देखील आहे, जी ग्राहकांना दागिन्यांची कलाकुसर आणि वैयक्तिक सहभागाचा अनोखा अनुभव देते.

डिझाइन, व्याप्ती आणि ग्राहकांचा अनुभव यांवर लक्ष केंद्रित करून पुण्यातील ग्राहकांच्या विविध आवडीनिवडी पूर्ण करण्याचे या स्टोअरचे उद्दिष्ट आहे. हे लाँच पश्चिम भारतातील इंद्रियाची उपस्थिती अधिक दृढ करते आणि प्रीमियम रिटेल क्षेत्रातील ब्रँडची पोहोच वाढवते.

याप्रसंगी मत व्‍यक्त करत इंद्रियाचे सीईओ श्री. संदीप कोहली म्हणाले, “पुण्यातील संमिश्र ग्राहक वर्ग, त्‍यांच्‍या बदलत्या आवडीनिवडी आणि डिझाइन-आधारित दागिन्यांची मोठी मागणी लक्षात घेता पुणे आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. शहरातील आमच्या चौथ्या स्टोअरच्या माध्यमातून आमचा अधिकाधिक ग्राहकांना खरेदीचा उच्‍च दर्जाचा अनुभव देण्‍याचा मनसुबा आहे.”
आदित्य बिर्ला ग्रुपचा ब्रँड इंद्रिया पुण्यातील विस्तारासह महाराष्ट्रातील आपली उपस्थिती अधिक दृढ करत आहे. या माध्यमातून कंपनी आपले समकालीन दागिने संग्रह आणि वैशिष्ट्यपूर्ण खरेदीचा अनुभव गतिमान व वाढत्या बाजारपेठेत उपलब्ध करून देत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
28.1 ° C
28.1 °
28.1 °
30 %
1.5kmh
75 %
Sat
28 °
Sun
36 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
40 °

Most Popular

Recent Comments