पुणे :आयसीआय बँकेने डिजिटल पेमेंट कंपनीच्या ॲपवर पूर्व मंजुरी असलेल्या ग्राहकांना युपीआयवर झटपट क्रेडिट ऑफर करण्यासाठी फोनपेसह भागीदारी केल्याचे आज जाहीर केले आहे. या भागीदारीमुळे आयसीआयसीआय बँकेच्या लाखो पूर्व मंजुरी असलेल्या ग्राहकांना फोनपे ॲपवर झटपट अल्पकालीन क्रेडिट लाइन सक्रिय करण्यास आणि युपीआय व्यवहारांसाठी नियमितपणे आणि सुरक्षित रीतीने वापरण्यास सक्षम करते. बँक युपीआय वर ४५ दिवसांच्या परतफेडीच्या कालावधीसह रु. २लाखांपर्यंत क्रेडिट लाइन ऑफर करते.
सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्रवास आणि हॉटेल बुकिंग, बिल पेमेंट आणि बरेच काही खरेदी करण्यासाठी सक्षम करण्यासाठी ही सेवा जाहीर करण्यात आली आहे.
आयसीआयसीआय बँकेचे पेमेंट सोल्यूशन्सचे उत्पादन प्रमुख श्री. निरज त्रालशावाला म्हणाले की , “आम्ही लाखो ग्राहकांना नियमित आणि सोपा क्रेडिट ॲक्सेस देण्यासाठी फोनपेसह भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. सणासुदीच्या काळात, आयसीआयसीआय बँकेचे पूर्व मंजुरी असलेले ग्राहक फोनपेवर त्यांची खरेदी करण्यासाठी झटपट क्रेडिट लाइन सक्रिय करू शकतात. अखंड डिजिटल क्रेडिट देण्याच्या उद्देशाने, ही ऑफर आमच्या ग्राहकांच्या वैयक्तिक बँकिंग अनुभवामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.”
भागीदारीबद्दल भाष्य करताना, फोनपेच्या पेमेंट्स विभागाचे प्रमुख श्री. दीप अग्रवाल म्हणाले, “आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर पूर्व मंजुरी असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना युपीआय ऑफरची क्रेडिट लाइन वाढवण्यासाठी आयसीआयसीआय बँकेसोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहोत. ही भागीदारी ग्राहकांना फोनपे ॲपमधून त्वरित पूर्ण डिजिटल युजर अनुभवाद्वारे लवचिक अल्प-मुदतीचे क्रेडिट मिळवण्यास सक्षम करेल. युपीआय वरील क्रेडिट लाइन ही आणखी एक नाविन्यपूर्ण उत्पादन ऑफर आहे जी देशातील क्रेडिटचा वापर अनलॉक करेल आणि क्रांती करेल. फोनपेवर, आम्ही या उत्पादनाची जास्तीत जास्त पोहोच आणि उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि आयसीआयसीआय बँकेसोबतची ही भागीदारी त्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
ही क्रेडिट लाइन विविध युपीआय पेमेंट ॲप्लिकेशन्सवर इंटरऑपरेबल आहे आणि ग्राहकांना कोणतेही युपीआय पेमेंट ॲप वापरून व्यवहार करण्याची सुविधा पुरवते.