पुणे, : सूत्रांनुसार भारतातील सर्वात जलदगतीने विकसित होणाऱ्या बांधकाम साहित्य व्यासपिठांपैकी एक असलेल्या एक्सेल आणि टायगर ग्लोबल बॅक्ड इन्फ़्रा.मार्केटने, त्यांचे ड्राफ़्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) गोपनीय पद्धतीने सिक्युरीटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्डाकडे (सेबी) दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे.
याबद्दल माहिती असलेल्या लोकांचा मते, कंपनीचा मानस हा नवीन शेअर्स जारी करून, विद्यमान भागधारांकडून विक्रीसाठी ऑफ़र देऊन (ओएफएस) सुमारे ४,५०० ते ५,००० कोटींची रक्कम उभारण्याचा आहे.
याबद्दलची नोंद ही सेबीचा (इश्यु ऑफ़ कॅपिटल ॲन्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट) नियामक , २०१८मधील गोपनीय किंवा प्री-फ़ायलिंग मार्गाने केली गेली आहे. या तंत्रज्ञानानुसार डीआरएचपी सार्वजनिक करण्यापुर्वी कंपनीला शेअरचे ड्राफ़्ट ऑफ़र दस्तावेज, नियामकाकडे जमा करता येतात.
सूत्रांनुसार, कंपनीने कोटक इन्वेसमेंट बॅंकिंग, एचएसबीसी आणि गोल्डम सॅक्चला आपले मर्चंट बॅंकर म्हणून निवडले आहे. कंपनी किंवा त्यांचा प्रवक्त्यांनी आयपीओचा वेळेबद्दल काहीही सांगण्याचे नाकारले.
विविध माध्यमांनुसार, सध्या, इन्फ़्रा.मार्केटने सिरीज जी राऊंड फ़ंडिंगमध्ये रू.७३० कोटी उभारले , यामुळे २४,६०० कोटी रूपयांचा (२.८ अब्ज डॉलर्स) प्रस्तावित आयपीओ पुर्वीच त्यांची बॅलन्सशीट मजबूत झाली.
२०१६ मध्ये सौविक सेनगुप्ता आणि आदित्य शारदा यांनी निर्माण केलेले, इन्फ़्रा.मार्केट हे भारतातील सर्वात-जलद गतीने विकसित होणारे बांधकाम साहित्य व्यासपिठ बनले असून, त्यांचाद्वारे बांधकाम क्षेत्रातील संपूर्ण उपाययोजना प्रदान केल्या जातात.
२५०+ उत्पादन युनिट्सचा मजबूत नेटवर्क्ससह आणि आरडीसी कॉंक्रीट, शालीमार पेंट्स, एम्सर मिलेनियम टाईल्स आणि ॲम्स्ट्रॅड सारख्या कंपन्यांमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करून, कंपनी संपूर्ण भारतात १०,००० + रिटेल टचपॉंट्सचा माध्यमाने कार्यरत आहे. इन्फ़्रा.मार्केट हे असे एकमेव व्यासपिठ आहे जिथे १५+ उत्पादन श्रेणी उपलब्ध आहेत, ज्यात कॉन्क्रीट, वॉलिंग सोल्युशन्स, स्टील, ॲग्रीगेट्स, पाईप्स ॲन्ड फ़िटिंग्ज, एमडीएफ़, प्लायवुड, लॅमिनेट्स, टाईल्स, पेन्ट्स, मोड्युलर किचन, डिझायनर हार्डवेअर, इलेक्ट्रिकल्स, अपलायन्स आणि कन्सुमर ड्युरेबल्स चा समावेश होतो यामुळे बांधकामाचा प्रत्येक स्तरावर विश्वसनीयता, मापन आणि गुणवत्तेची हमी मिळाते.