पुणे, : भारतातील आघाडीची खाजगी क्षेत्र सामान्य विमा कंपनी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीने आज महाराष्ट्रात आरोग्य विमा अवलंबतेला गती देण्याच्या आपल्या योजनांची घोषणा करत महाराष्ट्राप्रती आपल्या कटिबद्धतेला अधिक दृढ केले आहे. विमा कंपनीसाठी महाराष्ट्र ही प्रमुख बाजारपेठ असण्यासह एचडीएफसी एर्गोचे महाराष्ट्रात ६,४१६ एजंट्स आणि ४२ शाखांचे प्रबळ नेटवर्क आहे, ज्यापैकी ३ शाखा पुण्यामध्ये आहेत.
चालू असलेल्या आर्थिक वर्षासाठी, आर्थिक वर्ष २५ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत विमा कंपनीने पुण्यामध्ये ७० कोटी रूपयांचे १७,२१४ आरोग्य दावे आणि महाराष्ट्रात २,१२१ कोटी रूपयांचे ४.२९ लाख आरोग्य दावे निकाली काढले आहेत.
एचडीएफसी एर्गोचे संचालक व चीफ बिझनेस ऑफिसर पार्थनील घोष म्हणाले की , ‘’नियामकांचा दृष्टिकोन ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’चे मार्गदर्शन असलेल्या एचडीएफसी एर्गोमध्ये आम्ही कानाकोपऱ्यापर्यंत विम्याबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी ‘अवेअरनेस, अव्हेलेबिलिटी अँड अॅक्सेसिबिलिटी’ या तीन आधारस्तंभांवर लक्ष केंद्रित करत आहोत. पुणे आमच्यासाठी प्रमुख बाजारपेठ आहे आणि आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी अधिक गुंतवणूक केली आहे. तसेच आम्ही विम्याचे महत्व व जागरूकता वाढवण्याप्रती कटिबद्ध आहोत.’’
ग्राहक-केंद्रितपणाला प्राधान्य देत एचडीएफसी एर्गोने हेअर अॅपच्या माध्यमातून इकोसिस्टम डिझाइन केली आहे. या अद्वितीय विमा-केंद्रित इकोसिस्टमचा ग्राहकांच्या आरोग्य व गतीशीलतेसंदर्भातील समस्यांचे निराकरण करण्याचा आणि आरोग्यसेवा व मोटर वाहनांवरील दैनंदिन खर्चांची बचत करण्यासाठी सोयीसुविधा देण्याचा मनसुबा आहे.
गरजेच्या वेळी सोयीसुविधा देण्यासाठी एचडीएफसी एर्गोने ग्राहकांरिता काही अद्वितीय उपक्रम लॉंच केले आहेत. लॉंच करण्यात आलेला उपक्रम ‘ईजी डिस्चार्ज फ्रॉम हॉस्पिटल्स’ कॅशलेस हॉस्पिटलायझेशनसाठी विनासायास डिस्चार्ज प्रक्रिेया देतो, जेथे ग्राहकांना त्यांच्या डिस्चार्जदरम्यान अधिक वेळ मान्यता प्रक्रियांची वाट पाहावी लागत नाही आणि कॅशलेस हॉस्पिटलायझेशन करणाऱ्या रूग्णांसाठी हॉस्पिटलने डिस्चार्ज सारांशावर स्वाक्षरी करताच त्वरित डिस्चार्ज मिळू शकते.
सध्या ही सेवा भारतातील १९०० हून अधिक हॉस्पिटल्ससह महाराष्ट्रातील जवळपास ४०० हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहे. तसेच, गेल्या आर्थिक वर्षादरम्यान कंपनीने सर्व गंभीर स्थिती असलेल्या रूग्णांसाठी ‘प्री-अप्रूव्ह्ड कॅशलेस फॅसिलिटी’ देखील सादर केली. या उपक्रमांतर्गत केमोथेरपी, डायलिसिस व रेडिओथेरपी अशा क्रोनिक आजारांसाठी कॅशनलेस हॉस्पिटलायझेशन करणारे रूग्ण एकाच आजारासाठी एकाच आरोग्यसेवा फॅसिलिटीमध्ये अनेक वेळा कॅशलेस हॉस्पिटलायझेशनचा लाभ घेण्याकरिता सिंगल मान्यता मिळवू शकतात.
एचडीएफसी एर्गोने आपल्या प्रक्रियांमध्ये विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सादर केले आहेत, जे विमा कंपनीला ग्राहकांच्या गरजा त्वरित आणि अधिक कार्यक्षमपणे पूर्ण करण्यास सक्षम करतात. सध्या, एचडीएफसी एर्गो आपले आरोग्य विम्याचे दावे ३८ मिनिटांत (पूर्वअधिकृत) निकाली काढते आणि ३० दिवसांच्या आत प्रतिपूर्ती दावे निकाली काढण्याच्या नियामकाच्या आदेशाच्या तुलनेत त्यांच्या प्रतिपूर्ती दाव्यांचा सरासरी टर्न अराउंड टाइम २.४ दिवस आहे.