12.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञान'एबीसीआयडी'त'एमआयटी एडीटी' विद्यापीठ अव्वल

‘एबीसीआयडी’त’एमआयटी एडीटी’ विद्यापीठ अव्वल

विद्यार्थ्यांना होणार अनेक फायदे; युजीसीकडूनही कौतुकाची थाप

पुणेः पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) वतीने तयार करण्यात आलेल्या आधार क्रमांका इतक्याच महत्वाच्या ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडीट (एबीसी) क्रमांकांच्या नोंदणीत येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाने राज्यातील खासगी विद्यापीठांच्या यादीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे.


आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि ऐच्छिक विषयांतील श्रेयांकांच्या हस्तांतरासाठी हा आयडी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून, त्यासाठीच युजीसीकडून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. युजीसीच्या या आवाहनाला उत्तम रित्या प्रतिसाद देत एमआयटी एडीटी विद्यापीठाने तब्बल १५,५६६ हून अधिक खात्यांची नोंदणी तसेच त्यामध्ये २८,२०२ हून अधिक क्रेडिट्सचा अंतर्भाव करून राज्यातील खासगी विद्यापीठांच्या यादीत बाजी मारली. या यादीत एमआयटी विश्वशांती विद्यापीठ(खाती-१५,१७६, क्रेडिट- ५५६१) दुसऱ्या तर अमेठी विद्यापीठ(खाती-७१५८, क्रेडिट-११५९८) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आतापर्यंत देशभरातील एक हजार ५९७ संस्थांमधील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी एबीसी आयडी तयार केला आहे. यामध्ये महाराष्ट्रात देशात सर्वांधीक ४० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्वच विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांनी ‘एबीसी’ खात्यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण भरण्यास सुरवात केली आहे. त्यात राज्यातील खाजगी विद्यापीठेही कुठेही मागे राहिलेली नाहीत. नुकत्याच झालेल्या आभासी बैठकीत युजीसीने एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कामगिरीची नोंद घेत कौतुक देखील केले आहे, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डाॅ.ज्ञानदेव नीलवर्ण यांनी दिली आहे.
या कामगिरीनंतर विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, कुलगुरूंचे सल्लागार डाॅ.शिवशरण माळी यांनी परीक्षा विभागाचे अभिनंदन केले आहे.


एबीसी आयडी म्हणजे काय?
ज्याप्रमाणे आपण बँकेतील खात्यात जमा केलेली रक्कम आपण कोठेही आणि केव्हाही काढू शकतो. अगदी तसेच विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले श्रेयांक(क्रेडिट) या आयडीच्या माध्यमातून ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडीटमध्ये जमा होतील. विद्यार्थ्याला जेंव्हा पदवी प्राप्त करायची असेल, तेंव्हा शैक्षणिक संस्था या श्रेयांकाचा वापर करू शकते. विद्यार्थी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन आयडी ओपन करू शकतात.

विद्यार्थ्यांना होणार हे फायदे :
१. विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठे किंवा शैक्षणिक संस्थांतून मिळालेली श्रेयांक सहज हस्तांतरित होतील.
२. ‘गॅप’ घेऊन परतलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा बॅंकेतील श्रेयांक वापरता येतील.
३. आवडते किंवा कौशल्याभिमूख अभ्यासक्रमांच्या गुणदानाची प्रक्रिया सुलभ होईल.
४. देशातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेतून श्रेयांक प्राप्त करात येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
12.1 ° C
12.1 °
12.1 °
82 %
0kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
22 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!