दिवाळीत ओप्पो इंडियाने आपल्या हॅशटॅग विश्वास का दीप या नवीन मोहिमेद्वारे उत्सवी वातावरण उजळून टाकले आहे. एका आकर्षक फिल्मच्या आणि काही डिजिटल अनुभवांच्या माध्यमातून हे अभियान देशभरात अनोख्या पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या दिवाळीचा शोध घेते, ज्यातून ‘विविधतेत एकता’चा प्रत्यय येतो. ‘प्रत्येक दिवाळीत विश्वासाचा दीप प्रज्वलित होतो’ हा संदेश या सणासुदीच्या मोसमात लोकांना आणि समुदायांना जोडणाऱ्या सखोल विश्वासाचा आणि आशेचा गौरव करतो.ओप्पो इंडियाच्या यूट्यूब, इन्स्टाग्राम, ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि सिनेमात सध्या दिसत असलेली हृदयस्पर्शी अॅड फिल्म प्रेक्षकांना वेगवेगळ्या प्रांतांची सहल घडवते. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात या फिल्मची सुरुवात होते. यात, एक तरुण वाळूच्या भयानक वादळात जोधपूरला आपल्या घरी पोहोचतो. त्याच्या आईने घराच्या छतावर लावलेल्या दिवाळीच्या दिव्याच्या रोखाने चालत तो घरी पोहोचतो. या फिल्ममध्ये ‘थारमधली दिवाळी’ दाखवली आहे व सोबत कठपुतळी हा कलाप्रकार देखील आहे.
हा प्रवास हिमाचल प्रदेशातील सुंदर डोंगराळ प्रदेशात पोहोचतो. येथे ‘बुढी दिवाळी’ची (अनेक समुदायात सुमारे एक महिन्यांनंतर साजरी केली जाते) जुनी परंपरा मध्यरात्रीच्या शेकोटी च्या उजेडात, नटी लोकनृत्य आणि संगीताच्या साथीने पडद्यावर जिवंत होते. शेवटी ही फिल्म गोवा या समुद्रकिनारपट्टीच्या शहरात पोहोचते. येथील जल्लोषपूर्ण नरकचतुर्दशीचे सेलिब्रेशन दाखवले जाते. यावेळी नरकासुराच्या पुतळ्यांची मिरवणूक काढण्यात येते आणि पहाटेच्या सुमारास फटाक्यांच्या वर्षावात हे पुतळे जाळून दिवाळीची सुरुवात करण्यात येते.हा अनुभव अधिक सखोल करण्यासाठी ओप्पो इंडिया ने एक इंटरॅक्टिव्ह मायक्रोसाइट मायक्रोसाईट सुरू केली आहे. यावर यूझर्स दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश वगैरे राज्यांतील दिवाळीशी संबंधित अनोख्या परंपरा बघू शकतील आणि दिवाळीसाठी स्वतः एआय प्रेरित पोस्टकार्ड बनवू शकतील. या मोहिमेत ओप्पो इंडियाची रेनो १२ प्रो ५ जी , एफ २७ प्रो प्लस ५ जी , आणि ए ३ प्रो ५ जी ही उत्पादने अगदी टोकाच्या परिस्थितीतही सुंदर क्षण टिपून आपला टिकाउपणा आणि विश्वासार्हता सिद्ध करताना दाखवली आहेत.
ओप्पो इंडिया चे हेड ऑफ ब्रँड मार्केटिंग करण दुआ ( Karan Dua ) म्हणाले, “हॅशटॅग विश्वास का दीप सह आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या दिवाळीच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा एकत्र आणत आहोत. ‘प्रत्येक दिवाळीत विश्वासाचा दीप प्रज्वलित होतो’ या संदेशातून दाखवले आहे की, दिवाळीदरम्यान विश्वास आणि आशेचा दिवा कसा कुटुंबांना, मित्रांना आणि समुदायांना एकत्र आणतो! या अभियानाचा एक भाग म्हणून आम्ही एक इंटरॅक्टिव्ह मायक्रोसाइट तयार केली आहे. ज्यामध्ये यूझर्स विविध प्रांतांमध्ये दिवाळी कशी साजरी होते हे पाहू शकतात आणि स्वतःच एआय प्रेरित दिवाळी पोस्टकार्ड बनवू शकतात. विश्वास आणि लवचिकतेची ही भावना ओप्पो इंडिया च्या टिकाऊ आणि विश्वसनीय स्मार्टफोन द्वारे आपल्या यूझर्सना उत्कृष्ट अनुभव देण्याच्या वचनबद्धतेशी मिळतीजुळती आहे.”
ओप्पोने आपली ‘द्या ०, काळजी 0, जिंका १० लाख रु.’ ऑफर आणली आहे. यामध्ये रेनो १२ प्रो ५ जी आणि एफ २७ प्रो ५ जी सारख्या ओप्पो स्मार्टफोनच्या खरेदीवर नो-कॉस्ट एमआय , शून्य डाऊन पेमेंट, शून्य प्रोसेसिंग फी आणि तत्काळ कॅशबॅक वगैरे ऑफर आहेत. या ऑफर ओप्पो इंडिया रिटेल स्टोअर, ओप्पो ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर ५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध आहेत.