28.7 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानओप्पो तर्फे ओप्पो रेनो १३ सिरीज भारतात लॉन्च

ओप्पो तर्फे ओप्पो रेनो १३ सिरीज भारतात लॉन्च

पुणे : ओप्पो तर्फे ओप्पो रेनो १३ सिरीज भारतात लॉन्च करण्यात आलेली आहे. मीडियाटेक डायमेंसिटी ८३५० एसओसी द्वारा संचालित उच्च दर्जाची कॅमेरा प्रणाली आणि इमेजिंग आणि उत्पादकतेसाठीच्या अत्याधुनिक फीचर्सने सुसज्ज रेनो १३ सिरीज असामान्य परफॉर्मन्ससाठी डिझाईन करण्यात आली आहे. रेनो १३ सिरीजमध्ये ८० वॉट सुपरव्हूक फास्ट-चार्जिंग आहे त्यामुळे ते दीर्घ काळपर्यंत उत्तम चार्जिंग देते. हे स्मार्टफोन्स आता मेनलाइन रिटेल आउटलेट्स, ओप्पो ई-स्टोअर आणि फ्लिपकार्टवर ३७,९९९ रु. पासून उपलब्ध आहेत.

ओप्पो रेनो १३ ५ जी मध्ये पुढच्या आणि मागच्या बाजूस एरोस्पेस-ग्रेड अॅल्युमिनियम फ्रेम आणि कॉर्निंग गोरिला ग्लास ७ आय आहे ओप्पो ने खास भारतासाठी लुमिनस ब्लू रंगाचा खास व्हॅरियन्ट देखील सादर केला आहे. यामध्ये ऑफसेट प्रिंटिंग आणि रिफ्लेक्टिव्ह कोंटिंगद्वारे साधलेला एक अनोखा चमकदार इफेक्ट आहे. रेनो १३ ची फ्लॅट स्क्रीन ६.५९ इंचाची आहे आणि त्यात १२० हर्ट्झ स्मार्ट अॅडाप्टिव्ह १.५ के ओएलइडी प्रोएक्सडीआर डिस्प्ले आहे, जो बेझल-मुक्त व्ह्यूइंगसाठी आकर्षक ९३.४ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो प्रदान करतो. सर्वाधिक ब्राइटनेस १,२०० असल्याने तीव्र उन्हात देखील कंटेंट स्पष्ट दिसू शकतो.

रेनो १३ मध्ये एक प्रमुख-स्तरीय कॅमेरा प्रणाली आहे, ज्यात ५० एमपी प्रायमरी, ८ एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ एमपी मोनोक्रोम कॅमेरा आहे. या डिव्हाईसमध्ये ट्राय-मायक्रोफोन सिस्टम, ऑडिओ झूम आणि एकाच वेळी फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्यामधील ड्युअल ४ के व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी समर्थन आहे.
रेनो १३ मध्ये ओप्पो ची एआय क्लॅरिटी देखील आहे. एआय क्लॅरिटी हा दमदार जेनआय टूल्सचा एक नवीन संच आहे, जो एक साध्याशा टॅपने इमेजिस सुधारतो. दमदार अल्गोरिधम्सचा उपयोग करून त्याचा एआय क्लॅरिटी एनहॅन्सर १० एक्स झूम करून काढलेल्या इमेजिस सुधारतो आणि त्यामुळे ८ एक्स डिजिटल झूम केले तरी इमेज अगदी स्पष्ट दिसते.

कंपनीने ओप्पो रेनो १३ प्रो देखील प्रस्तुत केला आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रमुख-स्तरीय कॅमेरा प्रणालीसह स्मार्टफोन्ससाठी एक नवीन मापदंड स्थापित केला आहे. यामध्ये एक अद्भुत ६.८३ इंची इन्फाईनाइट व्ह्यू डिस्प्ले आहे, ज्यात चारही बाजूस मायक्रो कर्व्ह आणि एक प्रभावी ९३.८% स्क्रीन-टू-बॉडी गुणोत्तर आहे, जे बेझल-मुक्त व्ह्यूइंग अनुभव प्रदान करते. त्यामुळे बिंज वॉचिंग आणि सोशल मीडिया ब्राऊझिंगसाठी तो अगदी सही फोन आहे. या डिव्हाईसमध्ये मध्ये तिहेरी ५० एमपी +५० एमपी +८ एमपी कॅमेरा सेटअप असून त्यात एआय संचालित फीचर्ससह एक ३. ५ एक्स टेलिफोटो लेन्स समाविष्ट आहे. यातील ३. ५ एक्स ऑप्टिकल झूम असलेला ५० एमपी टेलिफोटो कॅमेरा तपशीलवार शॉटसाठी ८५ एमएम ला समकक्ष फोकल लेन्थ सुनिश्चित करतो. एआय टेक्नॉलॉजी अल्ट्रा-झूम शॉट १२० एक्स पर्यंत वाढवते, त्यामुळे कोणतेच तपशील सुटत नाहीत. एआय झूम क्षमतांसह ट्राय-मायक्रोफोन सिस्टम आणि ऑडिओ झूम सुनिश्चित करतात की हे फोन कॉन्सर्ट आणि इतर असामान्य, दर्जेदार परफॉर्मन्सचे रेकॉर्डिंग करण्यासाठी सही आहेत. या स्मार्टफोनमध्ये ८० वॉट सुपरव्हुक फ्लॅश चार्ज सपोर्टसह ५८०० एमएएच बॅटरी आहे.

रेनो १३ ५ जी दोन व्हॅरियन्टमध्ये उपलब्ध असेल आणि सर्व ऑफर्ससह त्याची प्रभावी किंमत ८ जीबी + १२८ जीबी साठी ३४,१९९ रु. तर ८ जीबी + २५६ जीबी साठी ३५,९९९ रु. असेल. तर, रेनो १३ प्रो ५ जी दोन व्हॅरियन्टमध्ये उपलब्ध असेल: सर्व ऑफर्ससह १२ जीबी +२५६ जीबी व्हॅरियन्टची प्रभावी किंमत ४४, ९९९ रु. तर १२ जीबी +५१२ जीबी व्हॅरियन्टची किंमत ४९,४९९ रु. असेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28.7 ° C
28.7 °
28.7 °
78 %
4.6kmh
97 %
Mon
29 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!