32.8 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानकाय सांगता? चक्क पडला पिवळा पाऊस

काय सांगता? चक्क पडला पिवळा पाऊस

स्थानिक प्रशासनानाकडून अभ्यास सुरु

हिंगोलीमध्ये पिवळा Yellow rain पाऊस पडल्याची एक आश्चर्यकारक घटना घडली. स्थानिकांनी या प्रकाराची माहिती प्रशासनाला कळवली, त्यानंतर प्रशासनाने याचा अभ्यास सुरु केला आहे.

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा गावच्या शिवारात अचानक आकाशातून पिवळ्या रंगाचे थेंब कोसळत असल्याचं चित्र होतं. मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे पिवळ्याwater रंगाचं पाणी आणि थेंब कोसळत असल्यानं भलत्याच चर्चांना उधाणही आलं. ग्रामस्थांनी याची माहिती प्रशासनाला दिली, याची गंभीर दखल घेत प्रशासनानं याचा अभ्यास करत असल्याचं सांगितलं.

दरम्यान, हा पिवळा पाऊस म्हणजे केमिकलयुक्त पाऊस असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. कारण अशा प्रकारचा पिवळा आणि काळ्या रंगाचे पावसाचे थेंब आकाशातून पडत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

रंगीत पावसाचे थेंब हे प्रदुषणामुळं तयार होतात. विशिष्ट प्रदुषित हवेशी ढगांमधून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याशी संपर्क झाल्यानंतर त्याचा रंग बदलतो आणि आपल्याला अशा प्रकारे विविध रंगांमध्ये पावसाचे थेंब पडत असल्याचा भास होतो. पण प्रशासनानं हिंगोलीतील या प्रकाराचा सखोल अभ्यास केल्यानंतरच नेमका हा प्रकार काय आहे? हे स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
32.8 ° C
32.8 °
32.8 °
61 %
3.8kmh
26 %
Wed
37 °
Thu
39 °
Fri
38 °
Sat
35 °
Sun
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!