28 C
New Delhi
Saturday, October 11, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानकेविनकेअरसोबत इनोव्हेशन अवॉर्डस् २०२५

केविनकेअरसोबत इनोव्हेशन अवॉर्डस् २०२५

  1. स्टार्टअप्स आणि एमएसएमईसाठी नावीन्यपूर्ण कल्पनांना राष्ट्रीय व्यासपीठ

पुणे, – नावीन्यपूर्ण बिझनेस मॉडेल्स आणि समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी केविनकेअर आणि मद्रास मॅनेजमेंट असोसिएशन (एमएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व्या चिन्नीकृष्णन इनोव्हेशन अवॉर्डस् २०२५साठी नामांकनांना सुरुवात झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ५० कोटी रुपयांपेक्षा कमी वार्षिक महसूल असलेली स्टार्टअप्स आणि एमएसएमई या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात.

या पुरस्कारांची स्थापना सॅशे क्रांतीचे जनक स्व. श्री. आर. चिन्नीकृष्णन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे केवळ तांत्रिक नवकल्पना नव्हे, तर समाजाच्या दैनंदिन जीवनावर सकारात्मक आणि वास्तववादी परिणाम करणाऱ्या, स्केलेबल व शाश्वत कल्पनांचा सन्मान करणे. इच्छुक अर्जदारांना www.ckinnovationawards.in या संकेतस्थळावर किंवा +९१ ६३७४६ ०३४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १ जुलै २०२५ आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना केविनकेअरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सी. के. रंगनाथन म्हणाले, “चिन्नीकृष्णन इनोव्हेशन अवॉर्डस् हे उदयोन्मुख उद्योजकांना नवे स्वप्न, नवे धैर्य आणि राष्ट्रीय व्यासपीठ देतात. परंपरांना आव्हान देणाऱ्या आणि सामाजिक बदल घडवणाऱ्या कल्पनांना आम्ही प्रोत्साहित करतो.”

या पुरस्कारांतर्गत तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विजेत्यांची निवड केली जाईल. प्रत्येक विजेत्याला १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक तसेच मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग, पेटंट अर्ज, संशोधन व विकास, आर्थिक सल्ला, एचआर मार्गदर्शन, उद्योगतज्ज्ञांचा सल्ला आणि बँका व वित्तसंस्थांशी जोडणाऱ्या स्ट्रॅटेजिक लिंकेजेस अशा सर्वांगीण व्यावसायिक सहाय्याची संधी मिळेल.

२०११ पासून सुरु असलेल्या या पुरस्कारांनी आजवर ५० हून अधिक उद्योजकांना राष्ट्रीय ओळख मिळवून दिली आहे. समाजाभिमुख आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या जडणघडणीत या उपक्रमाचा मोलाचा वाटा आहे.

देशभरातील नव्या स्टार्टअप्स आणि एमएसएमईंसाठी ही एक सुवर्णसंधी आहे – आपल्या कल्पनांना राष्ट्रीय स्तरावर नेण्याची आणि व्यवसाय क्षेत्रात नवे यश मिळवण्याची!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
28 ° C
28 °
28 °
34 %
2.2kmh
0 %
Fri
28 °
Sat
31 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!