पुणे – “कौशल्यविकासाच्या योजनांमधून समाजात सकारात्मक बदल घडतो. त्यामुळे शासन आणि मंत्रीमंडळातील सदस्यांनी अशा उपक्रमांत अधिक सक्रिय सहभाग घेतला पाहिजे,” असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (DrNeelamGorhe)यांनी व्यक्त केले.
त्यावेळी त्या सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU), युनेस्को आणि एनएसडीसी यांच्या (SkillDevelopment)संयुक्त विद्यमाने आयोजित “स्किल डेव्हलपमेंट अँड टीव्हीईटी” या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शां.ब. मुजुमदार होते. यावेळी युनेस्को युनिवोकचे फेडरिक युब्लर, लडाखमधील एचआयएचे संस्थापक सोनम वांगचुक, (SkillIndia)पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंग आणि एसएसपीयूच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार हे देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमात एसएसपीयू आणि युनेस्को यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. यामधून नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती, जागतिक शैक्षणिक सहकार्य आणि (EducationForFuture) कौशल्याधिष्ठित शिक्षणाला चालना दिली जाणार आहे.
महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी कौशल्याचे प्रशिक्षण हे काळाची गरज असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. सोनम वांगचुक यांनी पारंपरिक शिक्षणातील आत्मिक मूल्ये आणि तंत्रज्ञानातील बदल यांच्यातील संतुलनाचे महत्त्व सांगितले.
डॉ. शां.ब. मुजुमदार आणि डॉ. स्वाती मुजुमदार यांनी भारताला कौशल्यसंपन्न राष्ट्र बनविण्यासाठी युवक, महिला आणि शिक्षक यांच्या भूमिकेवर भर दिला.
कार्यक्रमात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.