पुणे : ग्रीनलॅम इंडस्ट्रीज या एकात्मिक वूड पॅनल क्षेत्रातील कार्यरत कंपनी तर्फे सर्वसमावेशक सरफेसिंग आणि सबस्ट्रेट सोल्युशन्स हे १२० देशातील ग्राहकांना दिले जाता, कंपनी तर्फे त्यांच्या ग्रीनलॅम शॉपी- चिंतामणी डेकोर, न्यु टिंबर मार्केट भवानी पेठ, पुणे येथे नवीन डिस्प्ले सेंटर सुरु करण्यात आल्याची घोषणा केली. या शो रुम मध्ये ग्रीनलॅमच्या उत्पादनांच्या कलेक्शन सह ग्रीनलॅम एएफएक्स (ॲन्टी फिंगरप्रिंट सरफेसेस), ग्रीनलॅम क्लॅड्स (एक्सटिरियर कॉम्पॅक्ट पॅनल्स), ग्रीनलॅम लॅमिनेट्स (१ एमएम कलेक्शन) आणि ग्रीनलॅम लेक्सस कलेक्शन या भारतातील पहिल्या १.५० एमएम फ्ल्युटेड लॅमिनेट कलेक्शन सादर करण्यात येणार आहे. आकर्षक टेक्स्चर्स सह इको, शोअर आणि स्ट्रॅन्ड आणि ४५ आकर्षक डेकोर्स ने युक्त लेक्सस कलेक्शन मुळे सरफेसच्या डिझाईन मधील नाविन्यही येथे उपलब्ध आहे.
ग्रीनलॅम इंडस्ट्रीज ही कंपनी उच्च गुणवत्तेच्या आणि सुंदरतेने युक्त अशा सरफेस सोल्युशन्सचे उत्पादक म्हणून प्रसिध्द आहे. यांची परंपरा म्हणजे सर्वोत्कृष्टते साठीची ओढ आणि यासह कलात्मकता आणि अचूकतेचा संगम हा त्यांच्या महत्त्वपूर्ण ब्रॅन्ड्सच्या माध्यमातून प्रदर्शित होतात. त्यांच्या वैविध्यपूर्ण रेंज मध्ये टेक्स्चर, रंग आणि डिझाईनचे सर्वोत्कृष्ट मिश्रण हे ग्रीनलॅमच्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिले जाते. ग्रीनलॅमच्या ग्राहकांना वैविध्यपूर्ण काम करणारी उत्पादने उपलब्ध करुन दिली जात असून यामुळे ते त्यांच्या जागेची सुंदरता वाढवून अंतर्गत सजावटीचीही कलात्मकता वाढीस लागण्यास मदत होते.
ग्रीनलॅम तर्फे प्रत्येक लॅमिनेटचे उत्पादन हे अतिशय सखोल अशा अभ्यासाअंती तयार केलेले असून त्यामुळे ग्राहकांना सर्वोत्कृष्ट लॅमिनेट्स आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे मिळतात. वुड ग्रेन्स पॅटर्न पासून सॉलिड सरफेसेस पर्यंत प्रत्येक सजावटीचे उत्पादन हे निवासी, व्यावसायिक आणि सार्वजनिक जागांसाठीच्या गरजांनुसार तयार करण्यात येतात.लॅमिनेट शीट्स मध्येही अनेक वैशिष्ट्ये असून यांत ॲन्टी बॅक्टेरियल, अग्नीप्रतिबंधक, उष्णता, ओरखडे आणि इम्पॅक्ट पासून बचाव करणारे असून त्याच बरोबर त्यांच्या लॅमिनेट्स आणि कॉम्पॅक्ट कलेक्शन मधील अन्य उत्पादनांचा ही यामध्ये समावेश आहे.
या कलेक्शन मध्ये ॲन्टी फिंगरप्रिंट सरफेसेस, एचडी ग्लॉस सरफेसेस, काऊंटर टॉप लॅमिनेट्स,युनिकोअर लॅमिनेट्स, डिजिटल किंवा कस्टम लॅमिनेट्स, कॉम्पॅक्ट बोर्ड्स, क्लॅडिंग सोल्युशन्स आणि रेस्टरुम क्युबिकल्स सह अन्य अनेक उत्पादनांचा समावेश आहे. या डिस्प्ले सेंटरचे उद्घाटन अजय शिर्के ॲन्ड असोसिएट्सचे प्रिन्सिपल आर्किटेक्ट श्री. आणि श्रीमती अजय शिर्के यांच्या हस्ते विविध अंतर्गत सजावटकार आणि आर्किटेक्ट्स यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या उद्घाटना विषयी आपले मत व्यक्त करतांना ग्रीनलॅम लॅमिनेट ॲन्ड अलाईड ग्रीनलॅम इंडस्ट्रीज चे कंट्री हेड श्री. अनुज संगल म्हणाले “ ग्रीनलॅम इंडस्ट्रीज मध्ये आम्ही नेहमीच निवासी आणि व्यावसायिक जागांचे सौंदर्य वाढवणार्या गुणवत्तापूर्ण उपायांना उपलब्ध करुन देण्यासाठी वचनबध्द असतो. या शो रुम मध्ये आमच्या इंटिरियर स्पेसेस आणि एक्सटिरियर स्पेसेस श्रेणीतील सर्वोत्कृष्ट उत्पादने उपलब्ध करुन दिली जात असून ग्रीनलॅम लॅमिनेट्सचीही सर्व उत्पादने आता एकाच छताखाली उपलब्ध असतील. त्यांना आता आमची उत्पादने फूल शीट फॉरमॅट मध्ये पाहणे त्याचा अनुभव घेणे शक्य होईल. यातून आम्हाला आमच्या ग्राहकांची खरेदीची प्रक्रिया सोपी आणि आरामदायक करायची तर आहेच पण त्याच बरोबर ग्राहकांना त्यांचा खरेदीचा अनुभव अविस्मरणीय करायचा आहे. आंम्हाला खात्री आहे की या नवीन स्पेस मुळे कलात्मकतेला चालना मिळून ग्राहकांना त्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्यास प्रोत्साहन मिळेल.”