पुणे – डायसन या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान कंपनी तर्फे त्यांच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या डेमो स्टोअरची सुरुवात पुण्यात केल्याची घोषणा केली. शहरातील आघाडीचे शॉपिंग स्थळ असलेल्या फिनिक्स मॉल ऑफ दि मिलेनियम येथे हे डायसनचे डेमो स्टोअर असून यामध्ये ग्राहकांना डायसनच्या सर्व उत्पादनांसह तंत्रज्ञानाची माहिती घेणे शक्य होणार आहे.हे स्टोअर १०१६ चौरस फूटांवर पसरलेले असून सकाळी १० ते रात्री १० पर्यंत ग्राहकांसाठी खुले असेल.डायसन डेमो स्टोअर्स हे भारतातील अन्य शहरांतही उपलब्ध आहेत.
या स्टोअर मध्ये ग्राहकांना डायसन व्हॅक्युम्स सह विविध मजल्यांसह डेब्रीज (सिरीयल्स पासून आणि विविध प्रकारची धूळ) याच्या सह ‘ रिअल लाईफ’ सेटिंग्ज असून यामध्ये हवेची गुणवत्ता यांची माहिती रिअल टाईम पध्दतीने मिळू शकेल. त्याच बरोबर डायसन स्टायलिंग स्टेशन्स मध्ये खरेदीदारांना अत्याधुनिक डायसन ब्युटी टेक्नॉलॉजीज सह केसांची स्टाईल पाहता येऊ शकेल. त्याच बरोबर डायसनच्या ऑडिओ विभागाचा विशेष झोन असून ग्राहकांना आता डायसनच्या हाय फिडिलिटी हेडफोन्सचा अनुभव घेऊन ते खरेदी करणे शक्य होणार आहे.
डायसन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अंकीत जैन म्हणाले की “ डायसन डेमा स्टोअर्स हे केवळ उत्पादनांची विक्री करण्यासाठीच नव्हे तर उत्पादनांची माहिती आणि अनुभवासाठी आहे. पुण्यात महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या डेमो स्टोअरच्या माध्यमातून आम्ही डायसनच्या मालकांसह खरेदीदारांना निमंत्रित करत असून यामुळे त्यांना अजोड, अगदी खरा अनुभव देऊन डायसनच्या उत्पादनांचा ट्राय बिफोर यू बाय प्राप्त होऊ शकेल.”
डायसनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अगदी ताजा अनुभव घेण्याबरोबरच ग्राहकांना आता नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या डायसन एअरस्ट्रेट स्ट्रेटनर ची माहिती येथे उपस्थित असलेल्या डायसन एक्सपर्ट कडून मिळू शकेल. स्टायलिंग स्टेशन्स मध्ये डायसन स्टायलिस्ट कडून डायसन ब्युटी प्रॉडक्ट्सची माहिती मिळेल, ज्या मध्ये सर्व प्रकारचे केस आणि स्टायलिंग गरजांचा समावेश आहे. स्टोअर ला भेट देण्यासाठी व वेळेसह मास्टर क्लासेस विषयीची माहिती ग्राहक आता www.dyson.in.या वेबसाईटवर बुक करु शकतील.