नवीन केंद्र तुमच्या दारात व्हिसा सेवा देणारी “तुम्हाला पाहिजे तेथे व्हिसा
पुणे, : व्हिसा प्रॉसेसिंग, इमिग्रेशन आणि ग्लोबल कंपनी निर्मितीमध्ये विशेष सेवा प्रदान करणाऱ्या आघाडीच्या कंपनी डीयूडिजिटल ग्लोबल ने आज मुंबईत आपले नवीन व्हिसा अर्ज केंद्र (व्हीएसी) सुरू करण्याची घोषणा केली. केंद्राचे उद्घाटन एका निर्णायक वेळी होत आहे, कारण 2040 पर्यंत भारतातून बाहेर पडणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या 90 दशलक्षपर्यंत वाढेल असे अंदाज दर्शवले जात आहे. या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, व्हीएसी थायलंडवर विशेष लक्ष केंद्रित करून व्हिसा अर्जांवर प्रक्रिया करेल.
लोअर परेलमध्ये स्थित ही नवीन सुविधा नवीनतम तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि दररोज 2000 पेक्षा जास्त व्हिसा अर्ज हाताळण्यासाठी या क्षेत्रातील व्हिसा प्रक्रियेत क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. तब्बल 2000 स्क्वेअर फूट पसरलेले, हे नवीन व्हीएसी केवळ सेवा वितरणच वाढवणार नाही तर स्थानिक अर्थव्यवस्थेतही भरीव योगदान देईल. या केंद्राचे उद्घाटन थायलंडच्या उप-महावाणिज्यदूत मिस नट्टासुदा मेटाप्रसेर्ट आणि थायलंडच्या पर्यटन प्राधिकरणाचे डायरेक्टर श्री इसाडा साओवरोस यांच्या हस्ते झाले.
आपला उत्साह व्यक्त करताना, डीयूडिजिटल ग्लोबल चे सीईओ श्री. मनोज धर्मानी म्हणाले, “आमचे नवीन व्हिसा अर्ज केंद्र या प्रदेशातील व्हिसा आणि कॉन्सुलर सेवांची वाढती मागणी पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. आम्ही आमच्या अर्जदारांना कार्यक्षम आणि त्रासमुक्त सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही मुंबईतील ऑपरेशन्स स्केल करत असताना, आम्हाला सतत सुधारण्यात मदत करण्यासाठी फीडबॅक आणि सूचनांचे स्वागत करतो. आमचा विश्वास आहे की हा व्हीएसी व्हिसा अर्ज प्रक्रिया सुव्यवस्थित करून ग्राहकांचा अनुभव वाढवेल, ज्यानेकरून प्रवासी आणि भारतीय डायस्पोरा दोघांनाही फायदा होईल. आजच्या इंटरकनेक्टेड जगात, प्रवास आवश्यक आहे आणि थायलंड हे भारतीय नागरिकांसाठी पसंतीचे ठिकाण राहिले आहे.”
श्री धर्मानी पुढे पुढे म्हणाले, “तुम्हाला पाहिजे तेथे व्हिसा (व्हिसा व्हेअरेव्हर यू व्हॉन्ट ) ही सर्विस थेट तुमच्या दारापर्यंत पोहोचवणारी सेवा सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. अर्जदार सहजपणे घरबसल्या अर्ज करू शकतात आणि व्हिसा त्यांच्या घरापर्यंत पोहचेल.”
स्टैंडर्ड व्हिसा सर्विसेस व्यतिरिक्त, हा केंद्र डेस्टिनेशन थायलंड व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना पाच वर्षांच्या मल्टीपल एंट्री वैलिडिटी सह मदत करेल. एक समर्पित प्रीमियम लाउंज एलिवेटेड सर्विस लेवल शोधणाऱ्यांसाठी वैयक्तिकृत समर्थन आणि आरामदायक वातावरण प्रदान करतो.
डीयूडिजिटल ग्लोबल ने मेट्रो शहरांमध्ये आपला ठसा वाढवल्यामुळे, हे नवीन केंद्र व्हिसा अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, कार्यक्षम आणि वाढत्या प्रवाशांसाठी सोयीस्कर बनवण्यासाठी तयार आहे. अत्याधुनिक एन्क्रिप्शन आणि डेटा प्रोटेक्शन सिस्टम सर्व अर्जदारांच्या माहितीची गोपनीयता सुनिश्चित करून सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे.