30.7 C
New Delhi
Sunday, July 6, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानद डेटाटेक लॅब्समध्ये अत्याधुनिक AI रिसर्च लॅबचे चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

द डेटाटेक लॅब्समध्ये अत्याधुनिक AI रिसर्च लॅबचे चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संशोधन आणि शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, द डेटा टेक लॅब्स (The DataTech Labs) या संस्थेने पुण्यात आपले अत्याधुनिक AI संशोधन आणि नवोपक्रम प्रयोगशाळा (AI Research & Innovation Lab) यांचे उद्घाटन केले.

द डेटाटेक लॅब्स मध्ये AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) रिसर्च लॅबचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.  या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग कालकर आणि डी.वाय. पाटील विद्यापीठ, आंबीच्या कुलगुरू डॉ. सायली गणकर यांचीही विशेष उपस्थिती होती. 

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,  ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना, संशोधकांना, शैक्षणिक संस्था आणि शासनाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात नवकल्पना, कौशल्य विकास, संशोधन आणि धोरण निर्मितीसाठी एकत्र येण्याचे व्यासपीठ पुरवणार आहे. डेटाटेक लॅब्सची ही लॅब केवळ एक सुविधा नाही, तर भारताचे कौशल्यसंपन्न भविष्य घडविणारी एक चळवळ आहे. सातत्यपूर्ण प्रगती, नवकल्पनांची संस्कृती आणि प्रत्यक्ष परिणाम देणारे प्रकल्प हे खरोखरच कौतुकास्पद आहेत. 

डॉ. पराग काळकर म्हणाले, “आजच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव व तंत्रज्ञानाची जाणीव असणे आवश्यक आहे. ही लॅब शैक्षणिक व औद्योगिक जगतातील दुवा म्हणून काम करेल आणि नविन करिअरच्या संधी उपलब्ध करून देईल.”

डॉ. सायली गणकर म्हणाल्या, “या प्रकारच्या उपक्रमांमुळे भारत एक ज्ञानाधारित अर्थव्यवस्था बनू शकतो. डेटाटेक लॅब्सच्या टीमने आपल्या दृढ निश्चयाने आणि दूरदृष्टीने खरोखरच शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.”

डेटाटेक लॅब्सचे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO)  विनीत आंद्रे यांनी सांगितले की,  “ही लॅब म्हणजे बौद्धिक भांडवलात दीर्घकालीन गुंतवणूक आहे. आमचा विश्वास आहे की शाश्वत नवकल्पना या वित्तीय शिस्त व दूरदृष्टीपूर्ण धोके स्वीकारण्याच्या संतुलनातून घडतात. आम्ही प्रभावी, स्केलेबल उपाय विकसित करताना भावी प्रतिभेला घडविण्यावर भर देतो.”

डॉ. अमित आंद्रे यांच्या नेतृत्वाखाली डेटाटेक लॅब्स ने आतापर्यंतच्या अनेक अडचणींवर मात करत सातत्याने प्रगती साधली आहे. ही लॅब संशोधन, प्रशिक्षण आणि औद्योगिक सहकार्य यासाठी एक प्रमुख केंद्र बनणार असून भारताच्या AI आणि डिजिटल परिवर्तनात मोलाची भूमिका बजावेल.

लॅबमधून होणारे प्रमुख फायदे

विद्यार्थ्यांसाठी:

अत्याधुनिक AI उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा थेट अनुभव
संशोधन व प्रकल्प कार्यामधून अनुभवाधारित शिक्षण

शैक्षणिक संस्थांसाठी:

अभ्यासक्रमात उद्योगाशी सुसंगत बदल
सामायिक संशोधन प्रकल्प आणि प्रशिक्षण

शासनासाठी:

धोरण निर्मितीत आणि AI आधारित सरकारी उपक्रमांच्या अंमलबजावणीत सहकार्य
डिजिटल इंडिया आणि मिशन रोजगारला गती

पुणेकर नागरिकांसाठी:

स्मार्ट सिटी व पायाभूत सुविधांसाठी AI आधारित उपाय
आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, वाहतूक यांसारख्या क्षेत्रात उपयुक्त नवोपक्रम

ही लॅब केवळ पुण्याच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि औद्योगिक भविष्याला दिशा देणारी आहे. डेटाटेक लॅब्सच्या या पुढाकारामुळे पुणे शहर भारतातील AI संशोधनाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल यात शंका नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
30.7 ° C
30.7 °
30.7 °
65 %
2.6kmh
37 %
Sun
34 °
Mon
35 °
Tue
37 °
Wed
32 °
Thu
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!