PIMSEआणि NIPM पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने “HR समिट 2025” आयोजित करण्यात आला. “जागतिक कर्मचारी विविधता व्यवस्थापन: बहुराष्ट्रीय कंपन्यांतील अंतर्दृष्टी आणि सर्वोत्तम पद्धती” या विषयावर भर दिला गेला.
या परिषदेत नामवंत HR तज्ज्ञांनी सहभाग घेतला. प्रमुख वक्त्यांमध्ये श्री. कल्याण पवार, डॉ. अजीत ठाकूर, श्री. शांतनु घोषाल, सौ. पल्लवी सरकार, श्री. नितीन असळकर आणि डॉ. पोरीणिता बॅनर्जी यांचा समावेश होता.
डॉ. पोरीणिता बॅनर्जी यांच्या स्वागत भाषणाने समिटची सुरुवात झाली, त्यानंतर श्री. कल्याण पवार यांनी विविधतेमुळे होणाऱ्या नवसर्जन व उत्पादकतेवरील प्रभावावर प्रकाश टाकला. पॅनेल चर्चेद्वारे DEI धोरणे, सांस्कृतिक अडथळे आणि सर्वसमावेशक कार्यस्थळ निर्मिती यावर चर्चा झाली.
डॉ. पोरीणिता बॅनर्जी व डॉ. शीना अब्राहम यांच्या मार्गदर्शन व संयोजनामुळे हा समिट यशस्वी ठरला.