20.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानपीसीसीओई मध्ये रौप्य महोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

पीसीसीओई मध्ये रौप्य महोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

पिंपरी, -पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (पीसीसीओई) नुकतेच रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त महाविद्यालयाच्या नुकताच माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. यात एक हजार पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद रजत गुप्ता, वसुंधरा सिंह, संपदा कुलकर्णी, सौरभ बेदमुथा, संतोष पुजारी महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितल कुमार रवंदळे, माजी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख प्रा. अजित पाटील आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांनी मागील २५ वर्षांचा आढावा घेत महाविद्यालयाने केलेली उत्तुंग कामगिरी सर्वांसमोर मांडली. तसेच महाविद्यालयाचे धोरण मिशन, विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम व सर्वांगीण विकासासाठी केलेले काम याची माहिती दिली.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितल कुमार रवंदळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रास्ताविक करताना महाविद्यालयाने आतापर्यंत प्लेसमेंट मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल माहिती दिली. आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आयटी, कला, मनोरंजन स्पर्धा परीक्षा, व्यवसाय, परदेशांमध्ये उच्च शिक्षण, नोकरी यामध्ये स्वतंत्र ठसा उमटवून देशाचे नाव उज्वल केले आहे, याचा पीसीईटीच्या विश्वस्तांसह आम्हा सर्व प्राध्यापकांना सार्थ अभिमान आहे. महाविद्यालयाचे नाव उंचावण्यात विद्यार्थ्यांचे देखील मोठे योगदान आहे.
या माजी विद्यार्थ्यांनी आता इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. काही माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले. ते शिकलेल्या विभागामध्ये मध्ये जाऊन आपल्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटून विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सांस्कृतिक कार्यक्रमाने मेळाव्याची सांगता झाली.
सूत्र संचालन प्रा. राजकमल सांगोले आणि प्रा. सोनल शिर्के व आभार माजी विद्यार्थी वसुंधरा सिंह यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
37 %
3.6kmh
36 %
Tue
20 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!