26.2 C
New Delhi
Monday, July 7, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानमार्व्हल रिअॅल्‍टर्सकडून प्रख्‍यात बोट क्‍लब रोडवर मार्व्हल रिबेरा सादर

मार्व्हल रिअॅल्‍टर्सकडून प्रख्‍यात बोट क्‍लब रोडवर मार्व्हल रिबेरा सादर

पुणे, – – मार्व्हल रिअॅल्‍टर्स ही लक्‍झरी रिअल इस्‍टेटमधील प्रतिष्ठित कंपनी आता शहरातील सर्वात प्रख्‍यात स्‍थळ बोट क्‍लब रोडवर बांधकाम पूर्ण होण्‍याच्‍या जवळ असलेले अल्‍ट्रा-एक्‍सक्‍लुसिव्‍ह निवासी विकास मार्व्हल रिबेरा आहे. आधुनिक रॉयल्‍टीसाठी ‘अर्बन पॅलेस’ म्‍हणून डिझाइन करण्‍यात आलेल्‍या रिबेरामध्‍ये कालातीत आकर्षकतेसह सर्वोत्तम डिझाइन आणि अत्‍याधुनिक ऑटोमशेनचे संयोजन आहे, ज्‍यामधून अत्‍याधुनिक, अनुभवात्‍मक राहणीमानामधील अग्रणी महणून मार्व्हलचे स्‍थान अधिक दृढ होत आहे.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत मार्व्हल रिअॅल्‍टर्सचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत झवर म्‍हणाले, मार्व्हलमध्‍ये आम्‍ही सदनिकांचे बांधकाम करण्‍यासह वारसा निर्माण करतो. रिबेरासह आम्‍ही समकालीन शाही राहणीमानाची मोहकता देणारे आणि आधुनिक तंत्रज्ञान, विस्‍तृत लेआऊट्स व नदीकाठचा शांतमय परिसर यांचे उत्तम संयोजन असलेले निवास डिझाइन करत या दृष्टिकोनाला अधिक पुढे घेऊन गेलो आहोत. बोट क्‍लब रोड पुण्‍यातील सर्वात प्रख्‍यात स्‍थळांपैकी एक आहे आणि रिबेरामधून आजच्‍या सूक्ष्‍मदर्शी गृहमालकांच्‍या महत्त्वाकांक्षा दिसून येतात, जे गोपनीयता, प्रतिष्‍ठा आणि पॅनोरॅमिक लक्‍झरी मिळवण्‍याचा प्रयत्‍न करतात. हे फक्‍त निवास नाहीत तर प्राचीन भव्‍यता आणि आधुनिक आरामदायीपणाचे दुर्मिळ संयोजन आहेत. लक्‍झरीला प्राधान्‍य दिल्‍या जाणाऱ्या बाजारपेठेत रिबेरा नवीन मापदंड स्‍थापित करते.

जून २०२५ मध्‍ये सदनिकांचा ताबा देण्‍यास सज्‍ज असलेले रिबेरा शहरामध्‍ये आकर्षकता, सर्वोत्तम वातावरण आणि अत्‍याधुनिकता घेऊन येते. २,५०० चौरस फूटांपासून १०,००० चौरस फूटांपर्यंत चटई क्षेत्र (कारपेट एरिया) असलेल्‍या सदनिकांसह हा प्रकल्‍प पुण्‍यातील सर्वात महागड्या खाजगी निवसींपैकी एक आहे; रिबेरा त्‍याच्‍या आकारमानासह स्‍थायी भावनेसाठी देखील ओळखले जाते. हे लक्‍झरी निवास असण्‍यासोबत भावी वारसा आहेत, जे लोकेशनपेक्षा वारशाला महत्त्व देणाऱ्यांसाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.

मार्व्हल रिबेरा ३.५, ४ व ५ बीएचके अपार्टमेंट्स आणि पेंटहाऊस ऑफर करते, प्रत्येक अपार्टमेंट मोकळेपणा, वातानुकूलित वातावरण, नयनरम्‍य दृश्ये आणि दुप्‍पट उंची असलेले खाजगी टेरेस प्रदान करण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन करण्‍यात आले आहे. आतील भागात इम्‍पोर्टेड संगमरवरी फ्लोअरिंग, सागवान लाकडाचे दरवाजे, बिल्‍ट-इन अप्‍लायन्‍सेससह ब्रँडेड मॉड्यूलर किचन आणि निवडक युनिट्समध्ये जकूझी व स्टीम रूमसह मास्टर बाथरूम आहेत.

लिव्हिंग स्‍पेस व्‍यतिरिक्‍त रिबेराच्‍या सर्वांगीण जीवनशैली इकोसिस्‍टममध्‍ये उच्‍च-स्‍तरीय सुविधा आहेत, जसे इन्फिनिटी पूल, लँडस्केप्ड प्रोमेनेड, भव्य लॉबी, खाजगी सलून व स्पा, योगा स्टुडिओ, बिझनेस लाऊंज, पोकर रूम आणि बारसह मनोरंजन क्षेत्र व समर्पित कर्मचारी सुविधा. निवास केंद्रीकृत अपार्टमेंट व्यवस्थापन सिस्‍टमसह सुसज्ज आहेत, ज्‍यामध्‍ये लायटिंग, एअर कंडिशनिंग, गिझर्स अशा अप्‍लायन्‍सेसचे टच-स्क्रिन आणि रिमोट कंट्रोल आहेत, ज्‍यामुळे प्रत्‍येक निवासीला सोयीसुविधा व कस्‍टमायझेशन मिळते.

पुण्‍यातील रिअल इस्‍टेट बाजारपेठ, विशेषत: उच्‍च-मूल्‍य श्रेणी प्रबळ होत असताना रिबेरा लाँच करण्‍यात आले आहे. अॅनारॉकच्‍या २०२५च्‍या पहिल्‍या तिमाहीच्‍या अहवालानुसार शहरातील एकूण घरांच्या विक्रीत मध्यम वाढ झाली असली तरी ब्रँडेड विकासाला प्राधान्य, मर्यादित जमिनीची उपलब्धता आणि महामारीनंतर बदलत्या जीवनशैलीच्या पसंतींमुळे प्रमुख ठिकाणांमधील प्रीमियम व लक्झरी प्रकल्प स्थिर राहिले आहेत.

मार्व्हल रिबेरामधून पुण्‍यातील रिअल इस्‍टेट लँडस्‍केपमध्‍ये व्‍यवहारात्‍मक ते अनुभवात्‍मक, चौरस फूट ते लक्षवेधक राहणीमानापर्यंत झालेले परिवर्तन निदर्शनास येते. शहर नवीन उत्‍पन्‍न, बौद्धिक राजधानी आणि डिझाइन-केंद्रित विकासाचे केंद्र म्‍हणून उदयास येत असताना रिबेरा नाविन्‍यपूर्ण आकर्षकतेचा उत्‍साह सादर करते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
26.2 ° C
26.2 °
26.2 °
87 %
3.1kmh
100 %
Mon
33 °
Tue
38 °
Wed
36 °
Thu
31 °
Fri
31 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!