20.1 C
New Delhi
Wednesday, November 5, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानश्रीराम प्रॉपर्टीजचा पुण्यातील ६ एकर प्राईम भूखंडासाठी संयुक्त विकास करारावर स्वाक्षरी

श्रीराम प्रॉपर्टीजचा पुण्यातील ६ एकर प्राईम भूखंडासाठी संयुक्त विकास करारावर स्वाक्षरी

पुणे- दक्षिण भारतातील अग्रगण्य निवासी बांधकाम व्यावसायिक असलेल्या श्रीराम प्रॉपर्टीज लिमिटेडने (एसपीएल) पुण्यात उगवत्या मायक्रो मार्केट असलेल्या उंड्री येथे ६ एकर प्राईम भूखंडासाठी संयुक्त विकास करारावर स्वाक्षरी केली आहे.

कंपनी संमिश्र वापरासाठी विकासाची योजना आखत असून यात ६५० पेक्षा अधिक अपार्टमेंट्स आणि काही रिटेल/व्यावसायिक जागा असणार आहे. याचे एकंदर विक्रीयोग्य क्षेत्रफळ १.० एमएसएफ (दशलक्ष चौरस फूट) असून त्याचा पुढील चार वर्षांत विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची एकंदर महसूलाची क्षमता ₹ ७०० – ₹ ७५० कोटी रुपयांची आहे. हा प्रकल्प आर्थिक वर्ष २०२५ च्या उत्तरार्धात सादर करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. पुण्यातील या उगवत्या मायक्रो मार्केटमध्ये ओळख ठरणारा निवासी प्रकल्प साकार करण्याची एसपीएलची योजना आहे. या प्रकल्पातून आयटी/आयटीईएस जागा, रिटेल, प्रमुख शिक्षण संस्था आणि शहराच्या मध्यवर्ती स्थळांपर्यंत सुलभपणे पोचता येईल.

या प्रकल्पामध्ये अतिरिक्त ८ एकरच्या विकासाचाही पर्याय आहे, तो मुख्यतः रिटेल आणि व्यावसायिक असेल. या अतिरिक्त जागेसाठी विकासाचे अधिकार मिळविण्याच्या अंतिम टप्प्यात एसपीएल आहे, ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

एसपीएलने आता पुण्याच्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण ही दुसरी सर्वात मोठी निवासी बाजारपेठ असून अलिकडच्या वर्षांत तिची जोरदार वाढ झाली आहे. पुणे हे प्रामुख्याने मिड-मार्केट केंद्रित असून येथील एसपीएलच्या बंगळुरू आणि चेन्नई या मुख्य बाजारपेठांसारख्या ग्राहकवर्गाचा येथे लाभ मिळतो. वैविध्यपूर्ण आणि उत्साही आर्थिक घडामोडी आणि वाढत्या पायाभूत गुंतवणुकीचीही त्याला मदत मिळते.

या प्रकल्पाचे संपादन म्हणजे पुढील काही वर्षांमध्ये लाईट अॅसेट वेगवान वाढ साधण्याच्या एसपीएल च्या प्रयत्नांचा अविभाज्य भाग आहे. हा प्रकल्प तिच्या प्रकल्पांच्या सबळ ठेव्याला आणखी मजबूत करेल तसेच पुढील दिशेने गतीला मदत करेल. एसपीएलकडे ३० जून २०२४ पर्यंत ४२ एमएसएफचे विक्रीयोग्य क्षेत्रावरील ४२ प्रकल्पांचा मजबूत साठा आहे. त्यात २४.३ एमएसएफ विक्रीयोग्य क्षेत्रफळाचे २६ चालू प्रकल्प आहेत. चालू असलेल्या प्रकल्पांपैकी जवळपास ७५ टक्के आधीच विकले गेले आहेत आणि कंपनीकडे पूर्ण झालेल्या प्रकल्पांची ‘शून्य इन्व्हेंटरी ‘ आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
20.1 ° C
20.1 °
20.1 °
88 %
1.5kmh
75 %
Wed
31 °
Thu
31 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!