31.3 C
New Delhi
Sunday, April 20, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानसशक्त राजकारण, सशक्त भारताकरीता आठवी युवा संसद पुण्यात

सशक्त राजकारण, सशक्त भारताकरीता आठवी युवा संसद पुण्यात

जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्, पुणे तर्फे आयोजनसंसद कट्टा अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांची मुलाखत

पुणे : युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता तसेच सशक्त युवा, सशक्त राजकारण व सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा, याकरिता पुण्यामध्ये आठव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्, पुणे तर्फे गुरुवार, दिनांक ३० व शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष व संसदेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.



यावर्षी संसद कट्टा अंतर्गत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे मुलाखतीचे सत्र होणार आहे. संसदेत मागील वर्षी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुलाखत झाली होती. माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, गणराज्य संघाच्या संस्थापक अध्यक्ष सुषमा अंधारे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, भारतीय छात्र संसदेचे अध्यक्ष राहुल कराड, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर हे संसदेच्या कार्यकारिणीमध्ये आहेत.

संसदेत देशभरातील राजकारण, समाजकारण आणि विविध विषयांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी महाराष्ट्रातील तरुणांना मिळणार आहे. महाराष्ट्रातून सुमारे १५०० हजार विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी इंटरनॅशनल यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. पुण्यासह सोलापूर, अकोला, कोल्हापूर, मराठवाडा, कोकण यांसह विविध भागांतून विद्यार्थी संसदेकरीता येणार आहेत.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, ग्रामसभा ते लोकसभा, राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग, माध्यमे राजकारण घडवतात?, व्हिजन भारत २०२९, सशक्त युवा सशक्त राजकारण सशक्त भारत या विषयांवर संसदेत सत्र होणार आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवर अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. वयवर्षे १६ ते ४० मधील तरुणांनी संसदेत सहभाग घ्यावा. संसदेत सहभागी होण्याकरीता मोफत प्रवेश असून विद्यार्थीनींची एक दिवसाची पुण्यामध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी संसदेतील सहभागाकरीता मो. ९०६७९०९०७५ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf6CfpTukLUpQlzJRzogegIQ7jfbUQhEzs1AFL9j3J5miAuYw/viewform या लिंकवरुन फॉर्म भरावा. त्यानुसार विद्यार्थ्यांची नोंदणी होणार आहे. संसदेच्या माध्यमातून युवकांनी राजकारण आणि समाजकारणातील दिग्गजांसोबत संवाद साधावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. संसदेकरीता प्रवेश विनामूल्य आहे, तरी तरुणाईने मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
31.3 ° C
31.3 °
31.3 °
41 %
6kmh
16 %
Sun
41 °
Mon
41 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
40 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!